Rocky Aur Rani Ki Prem Kahani Twitter Review : प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' ची प्रतिक्षा करत होती. त्यांची प्रतिक्षा आज संपली आहे. आज 28 जुलै रोजी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच अनेकांनी चित्रपटाच्या तिकिटांची बूकिंग केली होती. अनेकांना करणसाठी हा चित्रपट पाहायचा होता. तर हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या काही नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांची खूप सुंदर अशी केमिस्ट्री पाहायला मिळते. एकमेकांच्या कुटुंबाला समजून घेण्यासाठी ते तीन महिन्यासाठी एकमेकांच्या घरी राहण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर त्यांच्या समोर कशी परिस्थिती होते ते पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटी या चित्रपटाचा प्रीमियर पाहण्यासाठी गेले होते आणि त्यावर त्यांनी हा एक उत्तम चित्रपट असल्याचे सांगितले. इतकंच काय तर आता प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यावर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, ते जाणून घेऊया.
#RockyAurRaniKiiPremKahaani 1st half:#RanveerSingh is absolutely hilarious! A balance of being quirky & endearing! Contrary to Tum Kya Mile: the chemistry works big time w/ Alia
— (@jammypants4) July 28, 2023
Deserved better music but the homage to vintage songs & Shabana Azmi & Dharmendra are the soul
#RockyAurRaniKiiPremKahaani : KJO’s still got it#RanveerSingh absolutely steals the show, sharing genuine chemistry #AliaBhatt
— ANMOL JAMWAL (@jammypants4) July 28, 2023
The on the nose messaging & theatrics slightly lose grip in the 2nd half but the film develops into a holistically wholesome family entertainer! pic.twitter.com/0hNw84HOJp
Watched her on screen after 6yrs
— (@kushmijazz) July 28, 2023
I love youu @aliaa08 #RockyAurRaniKiiPremKahaani pic.twitter.com/svtz5JGP49
प्रेक्षकांनी ट्विटरवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. चला तर जाणून घेऊया काय म्हणालेत नेटकरी... एक नेटकरी म्हणाला, 'करण जोहरची आजही जादू पाहायला मिळते. रणवीर सिंगनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्याची आणि आलियाची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळते. चित्रपटाची पटकथे इतकी चांगली नव्हती. सेकेंड हाफमध्ये चित्रपट पाहण्याची मज्जा निघून जाते. पण हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाचं नक्कीच मनोरंजन करणारा आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'चित्रपटाचा फर्स्ट हाफ खूप सुंदर आहे! त्यांची खोडकर बाजू आणि तुम क्या मिले गाण्यातील त्या दोघांची केमिस्ट्री ही प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. चित्रपटातील गाण्यांना पुरस्कार मिळायला हवा पण शबाना आझमी आणि धर्मेंद्र हे चित्रपटाचे स्टार आहेत.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हा इन्टर्व्हल आहे आणि मी आधीच रणवीर सिंगच्या प्रेमात आहे. मी आलियासाठी चित्रपट पाहायला आले पण रणवीरनं मन जिंकलं. आलिया खूप सुंदर दिसतेस आणि अप्रतिम चित्रपट आहे.'
Its interval of #RockyAurRaniKiiPremKahaani and i am already in love with @RanveerOfficial .
— (@MilesToGo0o) July 28, 2023
I came for Alia bhatt but Ranveer stealing the show !!
Alia you look Gorgeous @aliaa08
Awesome Movie pic.twitter.com/0pB2rIJCGP
A Genuine Real Review of #RockyAurRaniKiiPremKahaani by Bobby Bhai
— Manas (@Maanjoshi123) July 28, 2023
Where he is saying that he came out after watching 15-20 mins after interval, Kjo failed to learn direction in all these 25 years
It's a combo of all his old outdated films.#RockyAurRaniKiiPremKahaaniReview pic.twitter.com/vBNocSUOz5
here's my honest review of #RockyAurRaniKiiPremKahaani
— a. (@HypocriteAman__) July 28, 2023
Karan Johar is stuck in it's own cocoon. the world of cinema has changed, Terrible movie, done-to-death plot nd tropes nd just so long and boring. even the acting is pathetic, easily worst movie of Karan Johar.
0/5 pic.twitter.com/dejYzEO15P
काही लोकांना हा चित्रपट आवडला नाही. एक नेटकरी म्हणाला, 'करण जोहरनं त्याच्याच सगळ्या चित्रपटांचा मिळून हा चित्रपट बनवला आहे. कंटाळवाणी पटकथा आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'या 25 वर्षात करण दिग्दर्शन शिकला नाही.'
हेही वाचा : रजनीकांत यांचे मालदिवमध्ये जंगी स्वागत, व्हिडीओ समोर; 'जेलर' प्रदर्शनाआधी केली ट्रीप
रॉकी और रानीकी प्रेम कहानी या चित्रपटाविषयी बोलायचे झाले. तर प्रेक्षक कधीपासून चित्रपटाची प्रतिक्षा करत होते. चित्रपटातील गाणी चांगलीच व्हायरल झाली आहेत. तर आगाऊ बूकिंगसाठी देखील प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करेल याकडे अनेकांचे लक्ष आहे. या चित्रपटात रणवीर, आलिया, धर्मेंद्र, शबाना आझमी व्यतिरिक्त अभिनेत्री जया बच्चन देखील दिसत आहेत.