Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमिताभ बच्चन यांचा सेटवर झाला होता अपमान; 'या' अभिनेत्रीने उघड केली धक्कादायक आठवण, म्हणाल्या 'मी त्यांना...'

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा एकदा सेटवर एका बॉलिवूड अभिनेत्रीने अपमान केला होता. पाहूयात बिग बींनी यावर कशी दिलेली प्रतिक्रिया.

अमिताभ बच्चन यांचा सेटवर झाला होता अपमान; 'या' अभिनेत्रीने उघड केली धक्कादायक आठवण, म्हणाल्या 'मी त्यांना...'

Rohini Hattangadi insulted Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या शिस्तबद्ध आणि व्यावसायिक व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात. त्यांच्या सहकलाकारांबरोबर त्यांनी नेहमीच आदरपूर्वक आणि सौजन्यपूर्ण संबंध ठेवले आहेत. मात्र एक प्रसंग असा घडला, जेव्हा त्यांच्या सहकलाकाराने चुकून त्यांचा अपमान केला आणि त्यानंतर स्वतः त्या अभिनेत्रीला मोठं दुःख आणि अपराधीपणाची भावना जाणवली.

रोहिणी हट्टंगडी यांनी उघड केला एक विस्मरणीय प्रसंग
हा किस्सा अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी एका मुलाखतीत सांगितला. त्यांनी 1988 मध्ये आलेल्या शहेनशाह चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती. रोहिणी यांनी सांगितले की, ही त्यांची अमिताभ यांच्याशी पहिली भेट होती आणि त्यामुळे त्या अत्यंत घाबरलेल्या होत्या.

प्रसंग जसा घडला, तसा त्यांनी सांगितला
त्या म्हणाल्या, 'मी सेटवर पोहोचले होते आणि सुप्रिया पाठकसोबत थोडा वेळ गप्पा मारत बसले होते. इतक्यात अमिताभ सर शहेनशाहच्या पोशाखात आले. त्यांनी सुप्रियाला हसतहसत म्हणाले, 'बघ, त्याने मला कसे कपडे घातले आहेत' आणि त्या गप्पांमध्ये मी नकळत एक वाक्य बोलले आणि त्याचा अर्थ मला काही क्षणांनीच लक्षात आला.'

त्या शब्दांमुळे त्यांना स्वतःबद्दल वाईट वाटलं
'मी म्हणाले, 'लावारिसमध्ये तू जे केलंस, ते या कपड्यांपुढे काहीच नव्हतं.' आणि बोलल्या क्षणी माझ्या चेहऱ्यावर भीती पसरली. त्यांनी काहीच न बोलता ते शांतपणे निघून गेले. पण माझं मन त्यावेळी अक्षरशः तुटून गेलं होतं.'

हे ही वाचा: कोण होती सलमान खानची आजी? आईच्या आजारामुळे सलीम खानही शेवटची भेट घेऊ शकले नाहीत

या प्रसंगाने त्यांना आयुष्यभराची आठवण दिली
रोहिणी हट्टंगडी पुढे म्हणाल्या, 'अमिताभ बच्चन सरांनी त्या क्षणी काहीच प्रतिक्रिया दिली नाही, पण त्यांची शांतता हीच सर्वात मोठी प्रतिक्रिया होती. मला वाटलं, मी काहीतरी फार चुकीचं केलं आहे. त्या क्षणासाठी मी स्वतःला आयुष्यभर दोषी मानलं.' पुढे रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, 'मी त्यांच्याशी संवाद करण्यासाठी हजारो वेळा मरत होते. मी खूपदा यावर कसे उत्तर द्यायचे यावरही विचार करत होते.'

अमिताभ बच्चन यांच्या मोठेपणाची झलक दिसली
पण या प्रसंगानंतरही अमिताभ बच्चन यांनी कधीही ती गोष्ट मनावर घेतली नाही, उलट पुढच्या वेळेस त्यांनीच रोहिणी हट्टंगडी यांच्याशी अत्यंत प्रेमळपणे संवाद साधला. त्यांच्या या वागणुकीमुळे रोहिणी हट्टंगडी यांचा त्यांच्यावरील सन्मान अधिकच वाढला. त्या म्हणाल्या, 'त्यांचं मोठेपण म्हणजेच ते खरे महानायक आहेत.'

Read More