Marathi News> मनोरंजन
Advertisement

बाहुबलीच्या दिग्दर्शकाने लपवून ठेवल्या पुढच्या ब्लॉकबस्टरचा हिरो; कोण आहे 'तो'?

दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी आपल्या नवीन चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. पण ही बंदी त्याच्या चित्रपटाच्या नायकावरही लादण्यात आल्याचा आरोप आहे.
 

बाहुबलीच्या दिग्दर्शकाने लपवून ठेवल्या पुढच्या ब्लॉकबस्टरचा हिरो; कोण आहे 'तो'?

मुंबई : आरआरआर आणि बाहुबलीसारखे दमदार सिनेमाचे दिग्दर्शक एसएस राजामौलीने त्यांच्या आगामी सिनेमाची जोरदार तयारी सुरु केली आहे. सिनेमाचं शूटिंग भव्यदिव्य असणार आहे. सेटपासून ते सिनेमाच्या कथेपर्यंत सगळंच अगदी भव्यदिव्य असेलं. आता एसएस राजामौली त्याच्या आगामी सिनेमात तेलुगू सुपरस्टार महेश बाबूसोबत सिनेमात झळकणार आहे. मात्र सिनेमाच्या संबधित जोडलेल्या कोणत्याच गोष्टी समोर येऊ नये म्हणून आधीच पूर्व तयारी करण्यात आली आहे आणि या सिनेमाच्या हिरोवर या संबधीत बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये उत्साहाच वातावरण करण्यासाठी राजमौली असं करत असल्याचं बोललं जात आहे. 

दिग्दर्शक  एसएस राजामौली यांनी महेश बाबूला लोकांपासून आणि मीडियापासून दूर राहण्यास सांगितलं आहे. आणि यामगचं कारण म्हणजे त्याचा आगामी सिनेमातील लूक आहे. अभिनेता महेश बाबू या चित्रपटात पूर्णपणे वेगळा दिसणार आहे. त्यामुळेच दिग्दर्शकांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. महेश बाबू या लूकसाठी खूप मेहनत घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच तुमच्या आवडत्या हिरोला तुम्हाला काही दिवस पाहता येणार नसल्याचं बोललं जात आहे. 
 
दिग्दर्शक  एसएस राजामौलीच्या सिनेमात महेश बाबू दिसणार वेगळ्या लूकमध्ये
या लूक आणि महेश बाबूबद्दल सांगितलं जातंय की, एसएस राजामौली यांच्या चित्रपटात तो अशा भूमिकेत आणि लूकमध्ये दिसणार आहे, की याआधी तो असा कधीच दिसला नसेल. त्याला हॉलिवूड ट्रेनरच्या माध्यमातून तयार केलं जातंय. राजमौली यांचा हा सिनेमा एक थ्रिलर सिनेमा असल्याचं बोललं जातंय. मात्र अद्यापतरी याबाबतची कोणतीच अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही.
 
एसएस राजमौली असे दिग्दर्शक आहे जो लार्जर देन लाईफची कहाण्यांसाठी ओळखला जातो. मग त्याचा सिनेमा बाहूबली असो किंवा मग आरआरआर. या सिनेमातील लूकही खूप वेगळे होते. कहाण्यांना ज्या शैलीत सांगितलं गेलं की, ते देखील कमी पाहायला मिळतं. बाहुबली या चित्रपटाने प्रभासच्या करिअरची दिशा बदलून टाकली होती. प्रभासने त्याच्या कारकिर्दीची पाच वर्षे बाहुबलीसाठी दिली. याआधी राजमौली यांनी मक्कीसारखा चित्रपटही बनवला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या या नवीन चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.  

Read More