Marathi News> मनोरंजन
Advertisement

Kareena Kapoor गेली 18 वर्षे फॉलो करतेय एकच जीवनशैली; ब्रेकफास्ट, लंच अन् डिनरमध्ये काय खाते? Rujuta Diwekar ने सांगितला Diet Plan

बॉलिवूडमधील फिट आणि झिरो फिगरमध्ये एकच अभिनेत्री सगळ्यांचं लक्ष वेधून घेते ते म्हणजे करीना कपूर. महत्त्वाचं म्हणजे गेली 18 वर्षे करीना एकच डाएट फॉलो करत असल्याची माहिती तिचा न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितलं आहे. 

Kareena Kapoor गेली 18 वर्षे फॉलो करतेय एकच जीवनशैली; ब्रेकफास्ट, लंच अन् डिनरमध्ये काय खाते? Rujuta Diwekar ने सांगितला Diet Plan

Kareena Kapoor Diet plan : बॉलिवूडमधील फिट आणि झिरो फिगरमध्ये एकच अभिनेत्री सगळ्यांचं लक्ष वेधून घेते ते म्हणजे करीना कपूर. महत्त्वाचं म्हणजे गेली 18 वर्षे करीना एकच डाएट फॉलो करत असल्याची माहिती तिचा न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितलं आहे. 

Celebrity Fitness: करीना कपूर खान ही बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते. एवढंच नव्हे तर करिनामुळेच 'साईज झिरो' ही संकल्पना चर्चेत आली.  आई झाल्यानंतरही करीनाने झिरो फिगर कायम ठेवलं. करीना तंदुरुस्त आणि हेल्दी राहण्यासाठी योगा किंवा व्यायाम करते आणि तिच्या डाएटची देखील काळजी घेते. 

लल्लंटॉपला दिलेल्या मुलाखतीत, करिनाच्या न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी करीनाच्या डाएटबद्दल शेअर केले आहे. ऋजुता यांनी करीना नाश्त्यात, दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात काय खातात ते सांगितले. ऋजुता यांनी सांगितले की, करीना गेल्या 18 वर्षांपासून म्हणजेच 2009 पासून हा डाएट फॉलो करत आहे.

करीना कपूर खानचा डाएट 

सकाळी नाश्त्यापूर्वी - बदाम, अंजीर आणि मनुका सारखा सुकामेवा

नाश्ता - पराठा किंवा पोहे

दुपारचे जेवण - डाळ आणि भात किंवा चीज टोस्ट

संध्याकाळचा नाश्ता - आंबा किंवा आंब्याचा मिल्कशेक (हंगामी शेक)

रात्रीचे जेवण - खिचडी किंवा पुलाव तूपासह

ऋजुता दिवेकर म्हणाली की, करीनाला सेटवर डाळ-भात खायला आवडते आणि ती सहसा दुपारच्या जेवणात चपाती-भाजी खाते. ऋजुता यांनी असेही सांगितले की करीना आठवड्यातून चार वेळा खिचडी आणि तूप खाते.

करीनाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचा स्वयंपाकी तिच्यावर नाराज आहे कारण करीनाला १० ते १५ दिवस सतत एकाच प्रकारचे अन्न शिजवले जाते. तोच डाळ भात किंवा दही भात. करीना म्हणाली होती, "मी आठवड्यातून ५ दिवस खिचडी खाल्ल्यानंतरही आनंदी राहू शकते. एक चमचा तूप घालून खाल्ल्यानंतर मला सर्वाधिक आनंद होतो."

योग आयुष्यात महत्त्वाचा

करिना स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी योगा करते. योगा हा करीनाच्या आयुष्याचा एक भाग आहे. तिला वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करायला आवडतात पण योगा तिच्या जीवनशैलीतून काढून टाकता येत नाही. करीना १० वर्षांपासून योगा करत आहे. योगाव्यतिरिक्त, करीना पिलेट्स, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम देखील करते.

Read More