Marathi News> मनोरंजन
Advertisement

रॅम्बोच्या मृत्यूची बोंबाबोंब... पण

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता सिल्वेस्टर स्टेलॉनच्या मृत्यूची सोशल मीडियावर अफवा पसरली आहे. त्यामुळे अशा चुकीच्या बातमीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन स्वतः रॅम्बोने म्हणजे सिल्वेस्टरने केले आहे. 

 रॅम्बोच्या मृत्यूची बोंबाबोंब... पण

न्यूयॉर्क : हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता सिल्वेस्टर स्टेलॉनच्या मृत्यूची सोशल मीडियावर अफवा पसरली आहे. त्यामुळे अशा चुकीच्या बातमीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन स्वतः रॅम्बोने म्हणजे सिल्वेस्टरने केले आहे. 

 सोशल मीडियावर सिल्वेस्टर स्टेलॉनचे निधन झाल्याची वाऱ्या सारखी पसरली  या संदर्भातील मेसेजही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या मेसेजवर प्रतिक्रिया देताना  सिल्वेस्टरने आपल्या चाहत्यांना याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. या मुर्खपणाकडे दुर्लक्ष करा असे टि्वट स्टेलॉनने केला आहे. 

 

 

Please ignore this stupidity… Alive and well and happy and healthy… Still punching!

A post shared by Sly Stallone (@officialslystallone) on

 मी ठणठणीत आहे असून आनंदी आहे. अजूनही ठोसे लगावत आहे असे सिल्वेस्टरने म्हटले आहे.  सोशल मीडियावर फिरणाऱ्या फोटोंमध्ये सिल्वेस्टर आजारी दिसत असून तो वार्धक्याने थकलेला दिसत आहे. तसेच  त्याच्या डोक्यावरचे केस गळलेले आहेत.  तसेच त्याच्या जन्माचे वर्ष आणि मृत्यूचे वर्ष असलेला फोटोही व्हायरल होत आहे. 

Read More