Sachin Pilgaonkar : 1980 आणि 90 च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्यांविषयी बोलायचे झाले तर त्यात काही ठरावीक कलाकारांची नावं येतात. त्यापैकी एक म्हणजे अभिनेते सचिन पिळगावकर. त्यांनी या काळात फक्त चित्रपटांमध्ये अभिनय केला नाही तर त्यासोबत दिग्दर्शन केलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी मराठीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की मोठ्या पडद्यावर दिसण्यासाठी 'माझ्याकडे सध्या कोणतेही काम नाही आणि मला कोणी कामही देत नाही. त्यामुळे चांगलीच चर्चा रंगली होती.' आता यासगळ्यावर सचिन पिळगावकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
सचिन पिळगावकर यांनी स्थळ या चित्रपटाच्या निमित्तानं चंद्रपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या संदर्भात सुरु असलेल्या एका पोस्ट बाबात खुलासा केला आहे. 'मला कुणीही काम देत नाही, या आशयाची त्यांची पोस्ट वायरल झाली होती. त्या संदर्भात बोलताना आपण ते मिश्कीलीनं बोललो असे सांगत मी अभिनय सोडलेला नाही, कोणा दिग्दर्शकाच्या कामात ढवळाढवळ देखील करत नाही, माझाही विचार व्हावा, परस्पर ठरवू नये असेही ते मिश्किलीने म्हणाले.'
सचिन पिळगावकर यांनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'मोठ्या पडद्यावर दिसण्यासाठी माझ्याकडे सध्या कोणतेही काम नाही आणि मला कोणी कामही देत नाही. आमच्या चित्रपटात काम करा असे म्हणायला माझ्याकडे कोणी येतही नाही. ते का येत नाही हे मला माहित नाही त्यांना कदाचित वाटत असेल की मी अभिनय सोडला आहे पण ती त्यांची चुकीची समजूत आहे.'
हेही वाचा : 31 वर्षीय Mostlysen अडकणार लग्नबंधनात! 13 वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर BF सोबत कर्जतमध्ये करणार लग्न; तारीखही ठरली
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सचिन पिळगावकर यांचा 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बऱ्याच काळानं सचिन पिळगावकर हे मोठ्या पडद्यावर दिसले. त्यांचा हा चित्रपट चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. 'हा माझा मार्ग एकला' या मराठी चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं होतं.