Marathi News> मनोरंजन
Advertisement

सचिन पिळगावकरांना 37 वर्षानंतर सापडली 'ती' 70 रुपयांची नोट; म्हणाले 'कुणी मला विचारेल...'

Sachin Pilgaonkar: 'अशी ही बनवाबनवी' सिनेमातील डायलॉग एकापेक्षा एक असे ठरले. सचिन पिळगावकरांनी याची एक आठवण शेअर केलीय. 

सचिन पिळगावकरांना 37 वर्षानंतर सापडली 'ती' 70 रुपयांची नोट; म्हणाले 'कुणी मला विचारेल...'

Sachin Pilgaonkar: 'अशी ही बनवाबनवी' चित्रपट पाहिला नसेल आणि त्यातील संवाद तोंडी नसतील असा मराठी चित्रपट चाहता फार क्वचितच सापडेल. 1988 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज 37 वर्षांनीही 'अशी ही बनवाबनवी' बद्दल तितकीच चर्चा होते. यातील '70 रुपये वारले' या मजेशीर डायलॉगचे अनेक मिम्स बनलेले आपण पाहतोय. अभिनेता, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी 'अशी ही बनवाबनवी'ची एक आठवण सोशल मीडियात शेअर केलाय. 

अजरामर सिनेमा

'अशी ही बनवाबनवी' सिनेमातील डायलॉग एकापेक्षा एक असे ठरले. 'तुम्ही दिलेले 70 रुपये वारले ओ, 'हा माझा बायको', 'धनंजय माने इथेच राहतात का?', 'आपल्या ऑफीसमधे झुरळ तशी कमीच ए का नाही?',  'लिंबु कलरची साडी', 'सुग्रास हॉटेल', 'आय लव्ह यु सेंट' असे एक ना अनेक डायलॉग आणि प्रसंगावर तुम्ही चर्चा केली असेल. 23 सप्टेंबर 1988 रोजी अशी हा बनवाबनवी चित्रपट प्रदर्शित झाला. धनंजय आणि शंतनू माने, परशुराम आणि सुधीर या चार मित्रांची पुणे शहरात भाड्याने घर मिळवण्यासाठी केलेली धडपड आणि घरात आलेली धमाल यात दाखवण्यात आलीय. किरण शांताराम यांची निर्मिती असलेल्या आणि वसंत सबनीस लिहिलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले. अवघ्या अडीच तासाच्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे पैसा वसूल मनोरंजन केले. तुम्ही हा चित्रपट पहिला असेल तर पहिल्या सीनपासून ते शेवटपर्यंत हसून लोटपोट व्हाल. या सिनेमातील गाणी खूप सुंदर आहे. धनंजय माने म्हणजे अशोक सराफ, सोबत लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि सोबत सुधीर जोशी यांनी हा सिनेमा अजरामर केला. 

काय म्हणाले सचिन पिळगावकर?

1988 पासून ऐकतोय 70 रुपये वारले पण आज 70 रुपयाची नोट पाहतोय! कुणी मला विचारेल, कशी ही बनवाबनवी? तर मी म्हणेन अशी ही बनवाबनवी. अशी पोस्ट सचिन पिळगावकर यांनी केलीय. 

'70 रुपये वारले'ची नेमकी कहाणी काय? 

'70 रुपये वारले'या डायलॉगची एक वेगळी कहाणी आहे. सिनेमाचे दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी कहाणी सांगितली होती. अशी ही बनवाबनवी चित्रपटात धनंजय माने विश्वास सरपोतदारांच्या घरात भाड्यानं राहत असतात. घरचे भाडे द्यायचे सोडून कोणतीतरी कारणे सांगून धनंजय माने घरमालकाकून पैसे घेत असतात. माझा मित्र इस्त्रायलला असतो. तिथं डायबिटीसवर औषध आहे, पण त्यासाठी 70 रुपये लागतील, असे धनंजय माने आपल्या घरमालकाला सांगतात. यानंतर घरमालक लगेच त्यांना 70 रुपये देतात. पण औषधे काही त्यांना मिळत नाहीत. घरमालक मानेंना 70 रुपयांबद्दल विचारतात. तेव्हा माझा इस्त्रायलवाला मित्र वारला, असे त्यांना सांगतात. यानंतक घरमालक विश्वास सरपोतदार मानेंना माझ्या 70 रुपयांचं काय झालं? असं  विचारतात. तेव्हा धनंजय माने म्हणतात की, तुमचे '70 रुपयेही वारले'.

कुठून सुचला डायलॉग? 

दिग्दर्शक सचिन पळगावकर यांनी एका मुलाखतीत '70 रुपयेही वारले' या डायलॉगमागचा किस्सा सांगितला होता. सिनेमाचे लेखक वसंत सबनीस यांना डायबिटीस होता. सबनिस यांनी त्यांच्या एका जवळच्या मित्राला इस्त्रायलमधून डायबिटीसचं औषध आणायला 70 रुपये दिले होतेय त्यांना त्यांच्या खऱ्या आयुष्यातला हा किस्सा सिनेमातही टाकला आणि आज तो अजरामर झालाय, असे सचिन पिळगावकर म्हणाले होते.

Read More