Marathi News> मनोरंजन
Advertisement

...म्हणून पत्नीला मुलांच्या वसतीगृहात ठेवायचा 'हा' बॉलिवूड अभिनेता

 मुलांच्या वसतीगृहातच राहायची त्याची पत्नी 

...म्हणून पत्नीला मुलांच्या वसतीगृहात ठेवायचा 'हा' बॉलिवूड अभिनेता

मुंबई : अनेकदा परिस्थितीपुढे आपण इतके हतबल होतो की, घडणाऱ्या प्रसंगांची पुढे जाऊन आठवण आल्यावर नकळतच चेहऱ्यावर हसू उमटतं. अशाच एका प्रसंगाचा, आठवणीचा उलगडा अभिनेत्याने केला आहे. चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या य़ा अभिनेत्यालाही कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात संघर्ष चुकलेला नाही. त्याच दिवसांतील काही आठवणींना या अभिनेत्याने एका कार्यक्रमादरम्यान उजाळा देत एक अशी आठवण सांगितली जे ऐकून सर्वांमध्ये हशा पिकला. 

'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात यावेळी पाहुणे म्हणून कुमार विश्वास यांच्यासह अभिनेता मनोज वायपेयी आणि पंकज त्रिपाठी यांनी हजेरी लावली होती. यावेळी पाहुण्यांशी गप्पा मारतेवेळी कपिलची विनोदी फटकेबाजी सुरुच होती. अशातच त्याने पंकज त्रिपाठीला एक प्रश्न विचारला. 

कलाकारांच्या खासगी आयुष्याविषयी काही प्रश्न विचारता विचारता कपिलने पंकजला एक फिरकी टाकली. आम्ही असं ऐकलं आहे की, तुमची पत्नी तुमच्यासोबत मुलांच्या वसतीगृहात राहात होती....; कपिलच्या या वक्तव्याला दुजोरा देत पंकजने यावर होकारार्थी उत्तर दिलं. 

'हो, हे खरं आहे', असं म्हणत लग्न लवकर झाल्यामुळे पत्नीला मुलांच्या वसतीगृहातच राहण्यासाठी आणल्याचं पंकजने सांगितलं. 'ती मुलांप्रमाणे राहत होती, अर्थात हे चुकीचं आहे. हो... पण एक बाब मात्र आहे की, तिच्या येण्यामुळे वसतीगृहातील मुलं मात्र नीट राहू लागली होती. वहिनी आल्या तर.... अशीच भीती त्यांना असायची. त्यावेळी वॉर्डनने लक्ष्मी नगर येथे घर घेण्याचा सल्लाही दिला होता. पण, मी घरुन इथेच गाय मागवण्याच्या आणि इथेच ठेवण्याच्या विचारात होतो....' असं म्हणत पंकजने एक सत्य मोठ्या विनोदी अंदाजात सर्वांसमोर ठेवलं. 

 
 
 
 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

कुमार विश्वास आणि मनोज वाजपेयी यांनीही या कार्यक्रमात धमाल केल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमादरम्यान, कपिलने त्याच्या शैलीत पंकजच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकप्रितेविषयीसुद्धा वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. 

Read More