Marathi News> मनोरंजन
Advertisement

'सेक्रेड गेम्स २'च्या कलाकारांचा ७०च्या दशकातील अंदाज

नेटफ्लिक्स वरील लोकप्रिय वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स ३' लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

'सेक्रेड गेम्स २'च्या कलाकारांचा ७०च्या दशकातील अंदाज

मुंबई : नेटफ्लिक्स वरील लोकप्रिय वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स ३' लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सीरिजच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. चाहत्यांचा हाच उत्साह कायम ठेवण्यासाठी सीरीच्या कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये 'सेक्रेड गेम्स २' कलाकार ७०व्या दशकतील दिसत आहेत. 

इन्स्टाग्राम शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये पंकज त्रिपाठी, रणवीर शौरी, कल्की कोचलिन, नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, सुरवीन चावला, जतिन सरना, ल्यूक कैनी झळकत आहेत. १५ ऑगस्टला ही सीरिज चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

‘सेक्रेड गेम्स २’च्या ट्रेलरमध्ये गणेश गायतोंडेचं एक वेगळंच रुप पाहायला मिळत आहे. सूट -बूट घातलेल्या ‘गायतोंडे’चा रुबाब पाहता हे सारं नेमकं कसं आणि कधी झालं, याचाच उलगडा सीरिजच्या दुसऱ्या भागातून होणार आहे. अभिनेता सैफ अली खान 'सेक्रेड गेम्स २' सीरिजमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या रूपात झळकणार आहे. 

Read More