Marathi News> मनोरंजन
Advertisement

जगात सर्वाधिक Dislike मिळणाऱ्या व्हिडिओमध्ये 'सडक-2' तिसऱ्या क्रमांकावर

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधल्या घराणेशाहीचा मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला. 

जगात सर्वाधिक Dislike मिळणाऱ्या व्हिडिओमध्ये 'सडक-2' तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधल्या घराणेशाहीचा मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला. देशभरातल्या नागरिकांनी यावरुन त्यांचा राग व्यक्त केला. याचा फटका आलिया भटचा सडक-2 या चित्रपटाच्या ट्रेलरलाही बसला. १२ ऑगस्टला सडक-2 चा ट्रेलर प्रदर्शित झाला, यानंतर सोशल मीडियावर या ट्रेलरला ट्रोल करण्यात आलं. युट्यूबवर या ट्रेलरला डिसलाईक्स मिळत आहेत. 

fallbacks

सडक-2 चा ट्रेलर सर्वाधिक डिसलाईक्स मिळणाऱ्या व्हिडिओमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर भारतात युट्यूबवर सर्वाधिक डिसलाईक्स मिळणाऱ्या व्हिडिओमध्ये सडक-2 पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला १०.६२ मिलियन डिसलाईक्स मिळाले आहेत, तर फक्त ५.९ लाख लोकांनी हा ट्रेलर लाईक केला आहे. 

fallbacks

विकिपीडियाने दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक डिसलाईक्स मिळवणाऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पॉपस्टार जस्टिन बिबरचं गाणं 'बेबी' आहे. बिबरच्या बेबी या गाण्याला ११.५९ मिलियन डिसलाईक्स मिळाले आहेत. तर पहिल्या क्रमांकावर स्वत: युट्यूबने टाकलेला २०१८ रिवाईंड व्हिडिओ आहे. या व्हिडिओला १८.२० लाख डिसलाईक्स मिळाले आहेत. विकिपीडियाने टाकलेल्या या माहितीची झी मीडिया पुष्टी करत नाही. 

fallbacks

महेश भट यांच्या सडक-2 या चित्रपटात त्यांच्या दोन मुली आलिया भट आणि पूजा भट तसंच संजय दत्त आणि निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरचा छोटा भाऊ आदित्य रॉय कपूर आहेत. 

Read More