Marathi News> मनोरंजन
Advertisement

पती झहीरला विचारल्याशिवाय सागरिका करत नाही कुठलचं काम

क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे नुकतेच लग्नबंधनात अडकले. झहीर-सागरिकाने हनीमूनवरुन परत आल्यानंतर एका ज्वेलरी ब्रँडचं प्रमोशन करताना पहायला मिळाले.

पती झहीरला विचारल्याशिवाय सागरिका करत नाही कुठलचं काम

नवी दिल्ली : क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे नुकतेच लग्नबंधनात अडकले. झहीर-सागरिकाने हनीमूनवरुन परत आल्यानंतर एका ज्वेलरी ब्रँडचं प्रमोशन करताना पहायला मिळाले.

यावेळी प्रसारमाध्यमांसोबत झहीर आणि सागरिका दोघांनीही संवाद साधला. लग्नानंतर झहीर खान आणि सागरिका हे मालदीव येथे हनीमूनसाठी गेले होते. 

बुधवारी मुंबईमध्ये नवविवाहीत दाम्पत्याने एका ज्वेलरी कलेक्शनचं अनावरण करण्यासाठी उपस्थिती लावली. यावेळी झहीर खानने आयएएनएस या न्यूज एजन्सीसोबत बोलताना म्हटलं की, मी आपल्या करिअरच्या अशा एका स्तरावर आहे जेथे केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करत आहे. आपल्या अनुभवाच्या जोरावर मी पूर्ण टीमला एकत्र जोडण्याचा प्रयत्न करत आहे. 

fallbacks

सागरिकाने म्हटलं की, मी कुठलंही काम करताना त्याचं (झहीर) मतं नेहमीच विचारते किंवा काम करत असल्याचं संकेतही देते. तर, झहीर खानने म्हटलं की आम्ही दोघेही एकमेकांचा आणि त्यांच्या रिलेशनशीपचा आदर करतो.

क्रिकेटर झहीर खानने यावेळी मान्य केलं की त्याची पत्नी सागरिका हीच त्याची स्टायलिश अॅडव्हायजर आहे. झहीरने सांगितले की, सागरिका माझी एक स्टायलिश बनली आहे. मी नेहमी मित्रांना सांगत असतो की माझ्या कपडे परिधान करण्यामध्ये जो बदल आला आहे तो पत्नीमुळे आला आहे.

सागरिकाने पुढे म्हटलं की, मी अशी भूमिका निवडते ज्याच्यासोबत मी जोडली जाते. माझा 'इरादा' हा सिनेमा पर्यावरण आणि प्रदूषणावर आधारित आहे. मी अशा प्रकारच्या सिनेमात काम करण्यास उत्सुक आहे.

Read More