Marathi News> मनोरंजन
Advertisement

झहीरच्या पत्नीसोबत फोटो क्लिक करुन फसला युवराज, पत्नीने केली 'अशी' कमेंट

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नानंतर मुंबईत नुकतचं रिसेप्शन सोहळा झाला.

झहीरच्या पत्नीसोबत फोटो क्लिक करुन फसला युवराज, पत्नीने केली 'अशी' कमेंट

मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नानंतर मुंबईत नुकतचं रिसेप्शन सोहळा झाला. या रिसेप्शननंतर आयोजित पार्टीतील अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या एका फोटोमध्ये सिक्सर किंग अर्थात युवराज सिंग हा झहीर खानची पत्नी सागरिका घाटकेसोबत पहायला मिळत आहे.

युवराज आणि सागरिका यांचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर युवराजची पत्नी हेजलने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

fallbacks

अभिनेत्री सागरिका घाटगेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये युवराज सिंगसोबत सागरिका दिसत आहे. या फोटोत दोघांनीही एकाच रंगाचे कपडे परिधान केल्याचं दिसत आहे. तसेच कपडेही जवळपास एकसारखेच आहेत. हेच कदाचित युवराजची पत्नी हेजलला आवडलं नाही आणि तिने या फोटोवर अशी काही कमेंट केली की त्यानंतर युजर्सने खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.

हा फोटो पोस्ट झाल्यानंतर युवराजची पत्नी हेजलने कमेंट करताना लिहिले की, "मला असं वाटतं की मलाही झहीर खानसोबत मॅचिंग आऊटफिट घालायला हवा होता".

हेजलने केलेली ही कमेंट करताच युजर्सने हेजचली खिल्ली उडविण्यास सुरुवात केली. काहींनी कमेंट केली की, आपल्या पतीला सागरिकासोबत पाहून हेजलच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली.

Read More