Sai Pallavi-Fahadh Faasil Movie : OTT वर दर आठवड्याला काही ना काही वेगळं पाहायला मिळतं. त्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज असतात. जे चित्रपट गे थिएटर्समध्ये प्रदर्शित होतात ते देखील तीन महिन्याच्या काळात ओटीटीवर प्रदर्शित होतात. पण आज आपण अशा चित्रपटाविषयी जाणून घेणार आहोत. जो थिएटरमध्ये 6 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सगळीकडे आता याच चित्रपटाची चर्चा रंगली आहे.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा असा कोणता चित्रपट आहे जो तब्बल 6 वर्षांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. तर या चित्रपटाचं नाव Athiran असून 2019 मध्ये हा प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट मूळ मल्याळम भाषेत आहे. या चित्रपटाची थीम ही सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. ज्यात साई पल्लवी आणि फहाद फासिल यांची मुख्य भूमिका आहे. त्यामुळे आता तुम्हालाही यात नेमकं असं काय आहे की ज्यामुळे हा चित्रपट ओटीटीवर येण्यासाठी 6 वर्ष लागले असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही हा चित्रपट पाहायलाच हवा. आता हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार याविषयी जाणून घेऊया.
आता इतक्या वर्षांनंतर OTT वर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट 'मस्ट वॉच' चित्रपट ठरला आहे. दरम्यान, ज्या कोणी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की हा चित्रपट एकदा पाहायलाच हवा. 'अथिरन' हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर जानेवारी 2025 ला डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला असून नंबर 1 ला ट्रेंड करत होती.
या चित्रपटाच्या कथेविषयी बोलायचं झालं तर केरळच्या रुग्णालयांवर आधारीत आहे. एका मानसोपचार तज्ञची गोष्ट आहे. कशा प्रकारे तो ऑटिस्टिक रुग्णांवर उपचार करतो हे सगळं त्यात दाखवण्यात आलं आहे.
हेही वाचा : 'शाहिद कपूरची पत्नी गर्विष्ठ;' 1500 रुपयांसाठी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी भांडली मीरा राजपूत, नेटकऱ्याचा दावा
साइकोलॉजिकल थ्रिलर 'अथिरन' मध्ये फहाद फासिल आणि साई पल्लवीशिवाय अतुल कुलकर्णी, रेन्जी पनिकर, शांती कृष्णा आणि सुदेव नायर महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. यात प्रकाश राज देखील आहेत. मात्र, त्यांची पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हे विवेक थॉमस वर्घीस आणि विवेकनं केलं आहे.