Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री सई ताम्हणकर 'वॉटर कप'ला यावर्षीही वेळ देणार

 आमीर खानची संकल्पना असलेल्या पाणी फाऊंडेशन यावर्षी मोठ्या प्रमाणात आपलं कार्य करणार आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर 'वॉटर कप'ला यावर्षीही वेळ देणार

मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकर यावर्षी देखील सत्यमेव वॉटर कप २०१८ साठी वेळ देणार आहे. आमीर खानची संकल्पना असलेल्या पाणी फाऊंडेशन यावर्षी मोठ्या प्रमाणात आपलं कार्य करणार आहे.

सई यावर्षीही श्रमदानाच्या कामात सहभागी

सई ताम्हणकर देखील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जावून जलसंधारणाच्या कामात सहभाग घेणार आहे. सई ताम्हणकरला सामाजिक कार्याची आवड आहे, महाराष्ट्रासाठी मी हे कार्य करतेय, याचं मला समाधान असल्याचं सई ताम्हणकरने २४ तास डॉट कॉमशी बोलताना सांगितलं.

धावपळीतही जलसंधारणच 'सई रे सई'

सई ताम्हणकरचा राक्षस सिनेमा पुढील महिन्यात येणार आहे, त्यानंतर तिचे एकानंतर एक चार सिनेमे येणार आहेत, तरी देखील या धावपळीत सई ताम्हणकर लोकांपर्यंत जलसंधारणाचं काम पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.

यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांना पाणी जिरवण्याविषयी आणि अडवण्याविषयीचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

Read More