Marathi News> मनोरंजन
Advertisement

'बंटी बबली' सिनेमाचा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज, सलमान खान देणार फॅन्सला सरप्राइज

अभिनेता सैफ अली खान आणि राणी मुखर्जी आगामी 'बंटी और बबली' 2 या सिनेमात दिसणार आहेत. 

'बंटी बबली' सिनेमाचा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज, सलमान खान देणार फॅन्सला सरप्राइज

मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि राणी मुखर्जी आगामी 'बंटी और बबली' 2 या सिनेमात दिसणार आहेत. 'बंटी बबली'2 ची घोषणा झाल्यापासून चाहते सिनेमाविषयी खूप उत्सुक आहेत. आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या सिनेमाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे काम कोरानामुळे बरेच दिवस रखडले होते. कोरोनामुळे रखडलेल्या सिनेमांच्या प्रदर्शनांच्या तारखा एकामागून एक समोर येत आहेत. आता धडाधड सिनेमा दिग्दर्शक  चित्रपटांच्या प्रदर्शनांच्या तारखा जाहीर करत आहेत. यशराज बॅनरचा 'बंटी और बबली' हा सिनेमा देखील या यादीमध्ये समाविष्ट होणार आहे.

बंटी बबली 2 ट्रेलर
सैफ अली खान आणि राणी मुखर्जी बर्‍याच दिवसानंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर धमाल करायला सज्ज झाले आहेत. 'बंटी बबली'2 ट्रेलर रिलीज होण्याबाबत बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, आता या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे.

एका वृत्तानुसार, या सिनेमाचा ट्रेलर लवकरच भेटीला येणार आहे. बातमीनुसार या सिनेमाच्या यशराज फिल्म्सने बरीच योजना केली आहे. एका वृत्तानुसार, 23 मार्च रोजी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होऊ शकतो आणि यासाठी यशराज सलमान खानची निवड करणार आहे.

असं म्हटलं जात आहे की, यशराजच्या टीमने सलमान खाननं चित्रपटाचा ट्रेलर लाईव्ह लाँच करायची योजना आखली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये. एप्रिलमध्ये हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अभिनेता चित्रपटावर म्हणाला
सिद्धांत चर्तुवेदीने यापूर्वी खुलासा केला होता की, ''बंटी और बबली 2'या भागासाठी मी खूप उत्सुक आहे. लोकांचा अत्साह पाहून मी देखील खूप उत्साही आहे. कोरोना महामारीनंतर या सिनेमासह सर्व काही ठीक होईल असे मला वाटते. हा सिनेमा कौटुंबिक मनोरंजन करणारा असेल.

हा एक उत्तम चित्रपट आहे. मला त्याचे चित्रीकरण करायला आवडले आणि अशा कठीण काळानंतर लोकांना खूप हलक्या आणि मजेदार गोष्टी पहायला आवडतील हे नक्की. त्याच्या या वक्तव्यानंतर चाहते हा हलका फुलका सिनेमा पाहण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Read More