Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : सैफ अली खानसोबत झालं 'मोए-मोए'; दुसऱ्या महिलेला करीना समजून केलं हे कृत्य

Kareena Kapoor and Saif ali Khan : सैफ अली खान आणि करीना कपूरचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल. सैफनं दुसऱ्याच महिलेला समजले करीना अन्...

VIDEO : सैफ अली खानसोबत झालं 'मोए-मोए'; दुसऱ्या महिलेला करीना समजून केलं हे कृत्य

Kareena Kapoor and Saif ali Khan : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांची जोडी ही लोकप्रिय स्टार कपल्सपैकी एक आहे. ते दोघं नेहमीच एकत्र स्पॉट होतात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्याशिवाय त्यांची केमिस्ट्री देखील तितकीच प्रेक्षकांना आवडते. करीना तर अनेकदा त्यांचे फोटो शेअर करताना दिसते. नुकताच त्या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून सैफ अली खानसोबत 'मोए मोए' झाल्याचं नेटकरी बोलत आहेत. त्याचा मजेशीर व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. 

सोमवारी 18 डिसेंबर रोजी करीना कपूर, सैफ अली खान हे त्यांच्या मुलांसोबत म्हणजेच तैमुर आणि जेहसोबत विमानतळावर स्पॉट झाले. सगळेच सेलिब्रिटी क्रिसमस आणि नवीन वर्ष साजरा करण्यासाठी जात असताना झालं असं की सैफ अली खाननं पापाराझींना पोज देण्यासाठी लाल रंगाचं जॅकेट असणाऱ्या दुसऱ्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवला. जेव्हा सैफच्या लक्षात आलं की त्याची चूक झाली त्यानं लगेच हात काढला. हे पाहता त्याच्याकडून चूक झाली आहे हे त्याच्या लक्षात आले आणि त्याला लाज वाटली. तर करीनानं काहीही रिअॅक्ट केलं नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, करीना आणि सैफच्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, दोघींनी लाल रंगाचे कपडे परिधान केले आहे. म्हणून त्यांच्या लक्षात आलं नसेल. बिचारा सैफ. दुसरा नेटकरी म्हणाला, हा तोच आहे ज्याला आपण दिल चाहतामध्ये पाहिलं. त्याचा काय मस्त सेन्स ऑफ ह्युमर आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, करीना म्हणत असेल की तू घरी चल तुला दाखवते. आणखी एक नेटकरी म्हणाला, करीनाचे एक्सप्रेशन बदललं. सैफची तर आज खैर नाही. दुसरा नेटकरी म्हणाला, तुझा प्रवास सुखकर जावो सैफ. तर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलं आहे की सैफसोबत मोए मोए झालं. 

हेही वाचा : दिव्यांग चाहत्यानं कमरेवर हात ठेवून फोटो काढताच अशी होती मलायकाची Reaction

करीना आणि सैफच्या कामाविषयी बोलायचे झाले तर करीनानं नुकताच ओटीटीवर डेब्यू केला असून जाने जान असं त्याचं नाव आहे. तर हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. 

Read More