Bollywood Celebrity Behaviour in Hospital : बॉलिवूड सेलिब्रिटी यांच्या विषयी त्यांच्या चाहत्यांना तितकंच माहित असतं जितकं ते सगळ्यांनासोबत शेअर करतात किंवा सोशल मीडियावर शेअर करतात. पण त्यांचं कॅमेऱ्या मागचं आयुष्य कसं आहे हे फार कमी लोकांना माहित असतं. आता लीलावती रुग्णालयात डायटीशियन म्हणून काम केलेल्या ख्याती रूपाणीनं बॉलिवूडचे मोठे सेलिब्रिटी अमिताभ बच्चन, सैफ अली खान आणि ऋषी कपूर यांच्याविषयी सांगितलं आहे. हे सेलिब्रिटी रुग्णालयात कसे वागतात याविषयी त्यांनी सांगितलं आहे. त्याशिवाय त्यांनी हे देखील सांगितलं की ऋषी कपूर हे चिडलेले असायचे कारण त्यांना रुग्णालयात नॉन व्हेज जेवण मिळत नव्हतं. तर अमिताभ बच्चन हे खूप शांत स्वभावाचे आहेत असं देखील त्यांनी सांगितलं.
ऋषी कपूर यांच्या विषयी सांगत ख्याती यांनी रोनक कोटेचा यांना सांगितलं की ऋषी कपूर यांना शाकाहारी (व्हेज जेवणं) आवडत नव्हतं आणि रुग्णालयात (नॉनव्हेज) मिळत नव्हतं. त्यामुळे ऋषी कपूर खूप चिडलेले असायचे. त्यांनी याविषयी सांगितलं की 'ऋषी कपूर त्यांच्यापैकी एक होते ज्यांना त्यांच्या जेवणात कोणत्याही प्रकारी कमी किंवा कमी जेवण दिलं तर ते आवडायचं नाही. तर मिसेज नीतू कायम बोलायच्या की त्यांना देऊ नका. त्यांना गुलाब जामुन का दिला? तर ते अशा क्लाएन्ट्स पैकी एक आहेत, जे नेहमी उदास असायचे. मी सगळं काही करण्याचा प्रयत्न केला पण मला वाटतं की त्यांचा मूड नेहमीच खराब असायचा.'
ख्याती त्यावेळी देखील रुग्णालयात होत्या जेव्हा अमिताभ बच्चन यांची आई तेजी बच्चन यांच्यावर त्या रुग्णालयात उपचार सुरु होते. ख्याती म्हणाल्या, 'अमिताभ यांच्याविषयी मी बोलायलाच हवं. श्रीमती तेजी बच्चन या 11 महिन्यांसाठी रुग्णालयात होत्या आणि त्यांना ट्यूबनं जेवण देण्यात येत होतं. या 11 महिन्यात कधी कधी त्यांना जेवण देण्यास उशिर व्हायचा, तरी देखील अमिताभ हे शांत रहायचे आणि त्यांनी स्टाफला विनंती केली की त्यांची आई तेजी बच्चन यांच्या उपचारामध्ये कोणत्याही प्रकारची हलगरजी करू नका.'
हेही वाचा : सासू मला पाट्यावर मसाला वाटायला लावायची', फराह खानने सांगितला लग्नानंतरचा संघर्ष
सैफ अली खानविषयी बोलताना ख्याती म्हणाल्या की तो एकदा काही टेस्ट करण्यासाठी रुग्णालयात पोहोचला होता. जेव्हा तो एन्जियोप्लास्टीसाठी रुग्णालयात अॅडमीट झाला होता तेव्हा त्यांनी जेवणात गोड पदार्थ राहू देण्याची मागणी केली होती. ख्याती यांन सांगितलं की 'जेव्हा त्याला जेवण दिलं तेव्हा त्यानं विचारलं की यात गोड का नाही?' ख्याती यांनी त्याला सांगितलं की 'त्याच्यावर एन्जियोप्लास्टीसाठी झाली आणि तो गोड खाऊ शकत नव्हता. मग त्यावर एकत्र मिळून आम्ही एक उपाय काढला. त्या किचनमध्ये गेल्या आणि सांगितलं की सैफ अली खानला रेग्युलर मिठाई द्यायला नको. तर आम्ही त्याच्यासाठी कस्टर्ड आणि जेली बनवायचो.'