Marathi News> मनोरंजन
Advertisement

असं नेमकं काय घडलं की, चारचौघांत सैफला मागावी लागली Ex Wife ची माफी? 

होत्याचं नव्हतं झालं.... सैफसाठी तो प्रसंग अंगावर काटा आणणारा 

असं नेमकं काय घडलं की, चारचौघांत सैफला मागावी लागली Ex Wife ची माफी? 

मुंबई : Saif Ali Khan Amrita Singh Divorce : सैफ अली खानने आपल्या एका मुलाखतीत एका मोठ्या वादावर खुलासा केला आहे. सैफने या मुलाखतीत सांगितलं की, त्या वादाचा त्याची पूर्व पत्नी अमृता सिंह हिच्यावर काय परिणाम झाला होता. 

हा संपूर्ण वाद 'मै खिलाडी तू अनाडी' शी संबंधित आहे. या सिनेमाला मिळालेल्या यशाचा परिणाम या घटनेवर घडला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सिनेमाला मिळालेल्या एका जबरदस्त यशानंतर सैफ आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्याकरता एका नाइट क्लबमध्ये गेला होता. यावेळी त्याचा काही लोकांसोबत वाद झाला. 

सिनेमाच्या यशाचा आनंद काही काळच टिकला 

सैफ सांगतो की, जेव्हा मी मित्रांसोबत नाइट क्लबमध्ये पोहोचलो. तेव्हा दोन मुलींनी मला डान्सकरता अप्रोच केलं. या मुलींसोबत त्यांचे बॉयफ्रेंड्स देखील होते. सैफच्या माहितीनुसार, त्याने या मुलींसोबत डान्स करण्याच नकार दिला. तसेच त्या मुलींच्या बॉयफ्रेंडला सांगितलं की, त्यांना समजवा. 

त्यावर एका मुलीच्या बॉयफ्रेडने म्हटले की,'तुझा चेहरा खूप चांगला आहे. मी आता ते बिघडवणार आहे.' असं म्हणत सैफच्या डोक्यावर जोरात पंच मारण्यात आला. 

सैफची चूक नसनाही अमृता सिंहची मागावी लागली माफी 

सैफच्या म्हणण्यानुसार, त्याला या प्रकरणाला जास्त महत्त्व द्यायचे नव्हते, त्यामुळे त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, त्याची पत्नी अमृता सिंगला या घटनेचे खूप वाईट वाटले. सर्वांसमोर या घटनेनंतर आपण अमृताची माफीही मागितल्याचे सैफने सांगितले. सैफवर विश्वास ठेवला तर त्याला पुन्हा कधीही अशा परिस्थितीचा सामना करायचा नाही.

 

Read More