Marathi News> मनोरंजन
Advertisement

नबाव सैफची चिमुकली महादेवाची मोठी भक्त, हातात कलश घेऊन...

पण तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती सतत चर्चेत असते.

 नबाव सैफची चिमुकली महादेवाची मोठी भक्त, हातात कलश घेऊन...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसोबतच त्याची बहिण सोहा अली खान  सध्या मोठ्या पडद्यापासून लांब आहे.पण तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती सतत चर्चेत असते.

बॉलीवूडचं लोकप्रिय कपल सोहा अली खान आणि कुणाल खेमू त्यांच्या मुलीला सण-उत्सवांबद्दल शिकवण्याची आणि तिला अधिक माहिती देण्याची एकही संधी सोडत नाहीत.

 हे जोडपे प्रत्येक सण आपल्या लहानपणापासूनच मुलगी इनाया हिला शिकवत आहेत. सोहा आणि कुणालने महाशिवरात्रीनिमित्त भगवान भोलेनाथांच्या जलाभिषेकाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब भक्तीमध्ये लीन झाले होते.

कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांनी 29 सप्टेंबर 2017 मध्ये छोट्या इनायाचे स्वागत केले होते. एका मुलाखतीत कुणालने पालक म्हणून तो कशाप्रकारे मुलींसोबत वागतो याबाबत सांगितले आहे. तिच्या येण्यानं कुणालचं आयुष्य पूर्वीपेक्षा पूर्णपणे बदलले आहे.

कुणाल आणि सोहा यांनी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर रुद्राभिषेक केला. दोघांनी इन्स्टाग्रावर पूजेचा व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

fallbacks

व्हिडिओमध्ये इनाया जलाभिषेक करताना दिसत आहे. या पूजेत संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते. व्हिडिओच्या शेवटी, इनाया तिचे वडील कुणालसोबत पाहुण्यांना जेवण देण्यासाठी मदत करताना दिसत आहे. 

Read More