Marathi News> मनोरंजन
Advertisement

रिंकू राजगुरूने केला एवढा मोठा बदल

2 वर्षानंतर अशी दिसते रिंकू राजगुरू

रिंकू राजगुरूने केला एवढा मोठा बदल

मुंबई : सैराटची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर पाहायला मिळत आहे. 29 एप्रिल 2018 रोजी सैराट या सिनेमाला 2 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सैराटच्या नावानं चांगभलं हा कार्यक्रम सुरू केला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा सैराटच्या आठवडींना उजाळा मिळणार आहे. पण त्याबरोबरच सैराट या सिनेमांतील कलाकारांमध्ये झालेला अमुलाग्र बदल हा सगळ्यांना सुखावणारा आहे. रिंकूमध्ये झालेल्या बदलाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. 

रिंकू राजगुरूमध्ये झाला हा बदल 

fallbacks

रिंकू राजगुरू सैराट सिनेमातून प्रकाशझोतात आली. सैराट सिनेमाच्या शुटिंग दरम्यान रिंकू सातवीत शिकत होती. सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा ती नववीत शिकत होती. सैराट सिनेमानंतर रिंकूची क्रेझ निर्माण झाली. डस्की लूक असलेली रिंकू राजगुरू लोकप्रिय अभिनेत्रींच्या रांगेत सेट झाली. मात्र आता तिच्यात झालेला बदल हा खरंच कौतुकास्पद आहे. सध्या सगळीकडे रिंकूच्या या नव्या लूकची चर्चा आहे. सैराटच्या नावानं चांगभलं या कार्यक्रमात पुन्हा एकदा आकाश ठोसर, रिंकू राजगुरू आणि नागराज मंजुळे एकाच मंचावर दिसले. तेव्हा रिंकूने आपलं वजन कमी करण्यासाठी खाय प्रयत्न केलं असल्याच दिसत आहे. 

सैराच्या वेळी अशी दिसत होती रिंकू 

fallbacks

सैराटया सिनेमाची शुटिंग सुरू झाली तेव्हा ती 7 वीच्या इयत्तेत शिकत होती. रिंकू राजगुरूची आई ही नागराज मंजुळेची मैत्रिण आहे. एकदा नागराजला भेटायला गेली असता या सिनेमासाठी तिला कास्ट करण्यात आलं. सिनेमाचं शुटिंग आणि त्यानंतर त्याच्या प्रदर्शनाचा काळ तोपर्यंत रिंकूमध्ये झालेला बदल हा आपण पाहिलाच. त्यानंतर सैराट सिनेमाच्या प्रमोशनच्या काळात रिंकूला आपण सगळ्यांनी पाहिलं. 

रिंकू राजगुरूला इतर सिनेमांत देखील काम 

रिंकू राजगुरू सैराटचा तामिळमध्ये होत असलेल्या रिमेकमध्ये काम करत आहे. रिंकू राजगुरूचे फिचर्स बघता ती तेलगु, तामिळ सिनेमांत देखील अभिनेत्रीचा रोल करू शकते. नागराजची हीच खासियत आहे की तो नॉ अॅक्टरला आपल्या सिनेमांत घेतो. आणि मग तेच कलाकार अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करतात. नागराज दिग्दर्शित सैराट या सिनेमाचं मेकिंग 29 एप्रिलपासून दाखवण्यात येणार आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले. 18 एप्रिल रोजी सैराटच्या नावानं चांगभल या कार्यक्रमाची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी रिंकूचा हा लूक दिसला. 

Read More