Marathi News> मनोरंजन
Advertisement

Saiyaara Collection: सैयारा चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, मोडले कमाईचे सर्व रेकॉर्ड्स; 4 दिवसात रचला इतिहास

Saiyaara Box Office Collection: मोहित सूरी दिग्दर्शित 'सैयारा' चित्रपट 2025 मधील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. कोणालाही अपेक्षा नसताना सैयारा स्लीपर हिट ठरला असून, कमाईतही नवे रेकॉर्ड्स प्रस्थापित केले आहेत.  

Saiyaara Collection: सैयारा चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, मोडले कमाईचे सर्व रेकॉर्ड्स; 4 दिवसात रचला इतिहास

Saiyaara Box Office Collection: मोहित सूरी दिग्दर्शित 'सैयारा' चित्रपट 2025 मधील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. कोणालाही अपेक्षा नसताना सैयारा स्लीपर हिट ठरला असून, कमाईतही नवे रेकॉर्ड्स प्रस्थापित केले आहेत. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने धुमाकूळ घातला असून, फक्त चार दिवसांत 100 कोटींचा पल्ला गाठला आहे. विशेष म्हणजे चित्रपटात नवखे कलाकार असतानाही प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटातून अहान पांडे आणि अनीत अनित पद्डा यांनी पदार्पण केलं आहे. नवख्या कलाकारांसह चित्रपटाने कमाईचा एक नवा रेकॉर्ड रचला आहे. 

Sacnik ने दिलेल्या वृत्तानुसार, पहिल्याच दिवशी चित्रपटाने 21 कोटींची कमाई केली. शनिवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झालेली पाहायला मिळाली. शनिवारी चित्रपटाने 26 कोटी आणि रविवारी 35.75 कोटींची कमाई केली. सोमवारी चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घट पाहायला मिळाली. सोमवारी चित्रपटाने एकूण 22.50 कोटी कमावले. 

'तेरे नाम पाहिला तर ही पोरं रडून रडून मरतील', Saiyaara चित्रपटामुळे GenZ होतायत ट्रोल; थिएटरमधील VIDEO व्हायरल

 

सोमवारी चित्रपटाच्या कमाईत घट झाली असली तरी त्याने 100 कोटींचा टप्पा गाठला आहे. भारतामध्ये चित्रपटाने एकूण 105.75 कोटी कमावले आहेत.

2025 मधील चित्रपटांच्या कमाईत सैयारा सातव्या क्रमांकावर आहे. अक्षय कुमार आणि अनन्या पांडेचा 'केसरी चॅप्टर 2' (92 कोटी), सनी देओलचा 'जाट' (88 कोटी) यांनी सैयाराने मागे टाकलं आहे. आता फक्त सलमान खानचा सिकंदर (110 कोटी) आणि अक्षय कुमारचा स्काय फोर्स (112 कोटी) त्याच्या पुढे आहेत. 

चित्रपटाची कथा, गाणी आणि अभिनय सर्वच काही प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. जर चित्रपटाने अशीच कामगिरी कायम ठेवली तर आठवडाभरात 150 कोटींची कमाई करण्याची शक्यता आहे. 

अहान पांडे आणि अनित पद्डा यांच्या प्रमुख भूमिका असणारा सैयारा 18 जुलै 2025 रोजी प्रदर्शित झाला. 'सैयारा'ची कथा वाणी (अनित पद्डा) आणि क्रिश (अहान पांडे) यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे, ज्यामध्ये प्रेम, ब्रेक अप आणि जीवनातील आव्हानं दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचे संगीत, विशेषतः त्याचे शीर्षकगीत प्रेक्षकांना खूप आवडलं आहे. यशराज फिल्म्स निर्मित या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळत आहे. 

Read More