Marathi News> मनोरंजन
Advertisement

45 कोटींचं बजेट असणाऱ्या 'सैयारा'ची पहिल्याच दिवशी मोठी कमाई, अहान पांडेचा पहिलाच चित्रपट ठरणार सुपरहिट!

अहान पांडेचा पहिला चित्रपट 'सैयारा' चित्रपटगृहात दाखल झाला असून तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

45 कोटींचं बजेट असणाऱ्या 'सैयारा'ची पहिल्याच दिवशी मोठी कमाई, अहान पांडेचा पहिलाच चित्रपट ठरणार सुपरहिट!

Saiyaara Box Office Collection Day 1: चंकी पांडे यांचा पुतण्या अहान पांडे याच्या पदार्पणाची फिल्म 'सैयारा' ने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही सिनेमाला जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाच्या यशामागे त्यातील थरार, उत्कट भावना आणि मजबूत कथा हे प्रमुख घटक असल्याचं ट्रेड एक्सपर्ट्सचं मत आहे.

मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ हे त्याच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट मानला जात होता. अनेक वर्षांनी त्याला एक मोठी हिट मिळाली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी जोरदार कमाई करत मोहित सूरीला धीर दिला आहे.

पहिल्या दिवशी कमाईचा विक्रम

सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 45 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘सैयारा’  चित्रपटाने पहिल्या दिवशी रात्री 11:30 वाजेपर्यंत 20.50 कोटींची कमाई केली. मोहित सूरीच्या याआधीच्या सुपरहिट चित्रपटांपैकी 'सैयारा' हा चित्रपट पहिला असा चित्रपट आहे ज्याने पहिल्याच दिवशी कमाईचा विक्रम मोडला आहे. याआधी त्याच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली पाहूयात सविस्तर. ज्यामध्ये 'मर्डर 2'  चित्रपटाने 6. 95 कोटी,  'आशिकी 2' ने 6.10 कोटी, 'हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटाने 10.30 कोटी,  'एक विलन' ने 16 कोटींची कमाई केली. 

नवीन कलाकारांना डेब्यू करताच मिळालं यश 

गेल्या काही काळात स्टारकिड्सची पदार्पण फिल्म फ्लॉप ठरत असतानाच अहान पांडेचा ही डेब्यू चित्रपट यशस्वी ठरला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सर्व नवीन कलाकार असूनही तो इतका लोकप्रिय ठरतोय यावरून सिद्ध होतं की मजबूत स्टोरीटेलिंग आणि फ्रेश केमिस्ट्री यामुळे प्रेक्षक सिनेमाकडे वळतात.

दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'सैयारा' ने हे सिद्ध केलं की नवीन कलाकारांना लॉन्च करणं कठीण नाही. तर संजय गुप्ता यांनी यशराजची तारीफ करताना म्हटलं की, त्यांनी चेहेरे लपवले आणि जादू थेटरमध्ये दाखवली. जर चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत राहिला, तर ‘सैयारा’ हा या वर्षातील सर्वात मोठ्या हिटपैकी एक ठरू शकतो. सध्याच्या ट्रेंडनुसार, हा चित्रपट विकेंडमध्येच आपलं बजेट वसूल करण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Read More