Marathi News> मनोरंजन
Advertisement

Saiyaara Box Office Collection: 'सैयारा'चित्रपटाचा धुमाकूळ, बजेटपेक्षा 3 पट अधिक कमाई, एकूण कलेक्शन किती?

अहान पांडेच्या 'सैयारा' या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली ते जाणून घेऊयात सविस्तर

Saiyaara Box Office Collection: 'सैयारा'चित्रपटाचा धुमाकूळ,  बजेटपेक्षा 3 पट अधिक कमाई, एकूण कलेक्शन किती?

Saiyaara Box Office Collection: अहान पांडेच्या 'सैयारा' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शक मोहित सूरी यांच्या रोमँटिक लव्ह स्टोरी असणाऱ्या ‘सैयारा’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांची जोडी असलेल्या या चित्रपटाने आपल्या उत्कट आणि भावनिक अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याचाच परिणाम बॉक्स ऑफिसवर दिसून येतोय. वीकडेमध्येही या चित्रपटाने कमाईचा जबरदस्त ट्रेंड कायम ठेवला आहे.

‘सैयारा’ची बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई 

पहिल्याच दिवशीपासून ‘सैयारा’ चित्रपटाने दहापटीच्या आकड्यात कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला आहे. सुट्टीचा दिवस नसताना देखील हा चित्रपट जणू वीकेंड असल्यासारखी कमाई करत आहे. सध्याच्या रिपोर्टनुसार, बुधवार म्हणजे चित्रपटाच्या सहाव्या दिवशी ‘सैयारा’ने 20 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'सैयारा' चित्रपटाच्या मंगळवारी झालेल्या कमाईच्या तुलनेत थोडीशी घसरण दिसून आली असली, तरी ती चिंतेची बाब नाही. एकंदर पाहता चित्रपटाचा परफॉर्मन्स वाखाणण्याजोगा राहिला आहे. काही तज्ज्ञांचा अंदाज आहे की विक्की कौशलच्या ‘छावा’ नंतर ‘सैयारा’ हा चित्रपट 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारी हिंदी चित्रपट ठरू शकते.

‘सैयारा’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन:
पहिला दिवस – 22 कोटी

दुसरा दिवस – 26.25 कोटी

तिसरा दिवस – 36.25 कोटी

चौथा दिवस – 24.25 कोटी

पाचवा दिवस – 25 कोटी

सहावा दिवस – 20 कोटी

एकूण कलेक्शन – 153.75 कोटी

हा ग्राफ पाहून स्पष्ट होते की ‘सैयारा’ने बॉक्स ऑफिसवर कमाईची प्रचंड लाट निर्माण केली आहे.

‘सैयारा’ची बजेटपेक्षाही जास्त कमाई

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘सैयारा’ चित्रपटाचे एकूण बजेट सुमारे 40 ते 45 कोटी रुपये इतके आहे. या तुलनेत पाहता या चित्रपटाने आतापर्यंत आपल्या बजेटच्या जवळपास तीनपट अधिक कमाई केली आहे. त्यामुळे ‘सैयारा’ हा 2025 मधील एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरत आहे.

Read More