Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तेरे नाम पाहिला तर ही पोरं रडून रडून मरतील', Saiyaara चित्रपटामुळे GenZ होतायत ट्रोल; थिएटरमधील VIDEO व्हायरल

Saiyaara Gen Z Trend: मोहित सूरी दिग्दर्शित 'सैयारा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गदारोळ घातला आहे. चित्रपटाने आतापर्यंत 91.75 कोटींची कमाई केली असून, लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. दरम्यान या चित्रपटामुळे GenZ ट्रेंड होत आहेत.   

'तेरे नाम पाहिला तर ही पोरं रडून रडून मरतील', Saiyaara चित्रपटामुळे GenZ होतायत ट्रोल; थिएटरमधील VIDEO व्हायरल

Saiyaara Gen Z Trend: बॉक्स ऑफिसवर सध्या मोहित सूरी दिग्दर्शित 'सैयारा' चित्रपटाने धुमाकूळ घातला असून, सगळीकडे त्याचीच चर्चा होताना दिसत आहे. सोमवारी चित्रपटाने 14 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत 91.75 कोटींची कमाई केली असून, लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. दरम्यान या चित्रपटामुळे GenZ ट्रेंड होत आहेत. याचं कारण चित्रपटगृहातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये तरुण-तरुणी अक्षरक्ष: धायमोकलून रडताना दिसत आहेत. यानंतर त्यांची खिल्ली उडवली जात असून, GenZ ना ट्रोल केलं जात आहे. 

तरुणाई चित्रपटगृहात सैयारा चित्रपट पाहतानाचे अनके व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये काही जण रडत असून, काही जण तर जोरजोरात ओरडताना दिसत आहेत. 

हे व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी व्यक्त होत असून, या खऱ्या भावना आहेत की अतिशयोक्ती अशी चर्चा करत आहेत. 

90 च्या दशकातील काहींनी तर 'तेरे नाम' चित्रपटाची आठवण काढली आहे. या GenZ ना जर 'तेरे नाम' दाखवला तर रडून रडून मरतील अशी खिल्ली काहींनी उडवली आहे.

अहान पांडे आणि अनित पद्डा यांच्या प्रमुख भूमिका असणारा सैयारा 18 जुलै 2025 रोजी प्रदर्शित झाला. 'सैयारा'ची कथा वाणी (अनित पद्डा) आणि क्रिश (अहान पांडे) यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे, ज्यामध्ये प्रेम, ब्रेक अप आणि जीवनातील आव्हानं दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचे संगीत, विशेषतः त्याचे शीर्षकगीत प्रेक्षकांना खूप आवडलं आहे. यशराज फिल्म्स निर्मित या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळत आहे. 

Read More