Marathi News> मनोरंजन
Advertisement

#MeToo साजिद खानवरच्या आरोपांवर बहीण - भाऊ म्हणतात...

फराह खान आणि साजिदचा चुलत भाऊ असलेल्या फरहान अख्तरनं या प्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली

#MeToo साजिद खानवरच्या आरोपांवर बहीण - भाऊ म्हणतात...

मुंबई : साजिद खानवर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांनंतर त्याच्यावर चहुबाजुंनी टीका होतेय. साजिद खानवर काही महिलांनी #MeToo मोहिमेत सहभागी होत छळाचा आरोप केलाय. या आरोपांनंतर साजिद खान 'हाऊसफुल ४' या सिनेमातून बाहेर झालाय. यानंतर आता साजिदच्या कुटुंबीयांनाही काही प्रश्न विचारण्यात येत आहेत. साजिदची बहीण सिनेनिर्माती फराह खान आणि साजिदचा चुलत भाऊ असलेल्या फरहान अख्तरनं या प्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

साजिदची बहिण फराहनं आपल्या कुटुंबीयांसाठी ही दु:खद वेळ असल्याचं म्हटलंय. 'माझ्या भावानं असं काही कृत्य केलं असेल तर त्याला त्याचं प्रायश्चित्त घ्यावचं लागेल. मी कोणत्याही परिस्थितीत अशा कोणत्याही वर्तनाचं समर्थन करणार नाही आणि मी त्या पीडित महिलांसोबत उभी आहे'.

 

fallbacks

तर दुसरीकडे साजिदचा चुलत भाऊ फरहान अख्तरनं आपल्या भावावरच्या आरोपांवर प्रतिक्रिया देत 'मी साजिदच्या वर्तनावरून आलेल्या बातम्यांमुळे हैराण, अचंबित आणि दु:खी आहे. कसं ते माहीत नाही पण त्याला या आरोपांसाठी निश्चितच प्रायश्चित्त घ्यावं लागेल'.

 

'हाऊसफुल ४' या आगामी सिनेमाचा दिग्दर्शक असलेल्या साजिद खाननं नैतिक जबाबदारी स्वीकारत या सिनेमातून काढता पाय घेतलाय. 'माझ्याविरुद्ध लावण्यात आलेल्या आरोपांनंतर कुटुंबीय, प्रोड्युसर आणि हाऊसफुल ४ च्या कलाकारांवर असलेल्या दबावामुळे मी माझी नैतिक जबाबदारी स्वीकारत या सिनेमाच्या दिग्दर्शनापासून स्वत:ला वेगळं करतोय. मी मीडियामध्ये असेलल्या माझ्या सहकाऱ्यांना केवळ इतकीच विनंती करतो की कृपया सत्य बाहेर येईपर्यंत कोणत्याही निर्णयावर पोहचू नका' असं साजिदनं म्हटलंय.

साजिदवर अभिनेत्री सलोनी चोपडा हिनं लैंगिक छळाचा आरोप केला होता. 

Read More