Marathi News> मनोरंजन
Advertisement

19 वर्षांच्या दिव्या भारतीला पाहताच प्रेमात पडले साजिद नाडियाडवाल! 10 महिनेही नाही चालला संसार अन्...

Sajid Nadiawala :  साजिद नाडियाडवाला यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या आणि दिव्या भारती यांच्या रिलेशनशिपविषयी असलेल्या या चर्चांविषयी तुम्हाला माहितीये का? 

19 वर्षांच्या दिव्या भारतीला पाहताच प्रेमात पडले साजिद नाडियाडवाल! 10 महिनेही नाही चालला संसार अन्...

Sajid Nadiawala : अनेक लोकप्रिय कॉमेडी चित्रपटांचे प्रोड्युसर राहिलेले साजिद नाडियाडवाल यांचा आज 18 फेब्रुवारी रोजी 57 वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमध्ये साजिद आणि सलमान खान यांच्यात असलेली मैत्री ही नेहमीच चर्चेत असते. पण तुम्हाला माहितीये का? सलमानसोबतच्या मैत्री शिवाय साजिद नाडियाडवाल यांचं खासगी आयुष्य देखील तितकंच चर्चेत होतं. ती म्हणजे त्यांची लव्ह स्टोरी. साजिद नाडियाडवाल हे अभिनेत्री दिव्या भारतीला डेट करत होते. इतकंच नाही तर त्यांनी लग्न देखील केलं. मात्र, त्यांची लव्ह स्टोरी ही अर्धवट राहिली. चला तर मग जाणून घेऊया साजिद यांच्या या लव्ह स्टोरीविषयी. 

साजिद नाडियाडवाल आणि दिव्या भारती सगळ्यात आधी शोला आणि शबनम या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. या चित्रपटात दिव्या भारती आणि गोविंदा मुख्य भूमिकेत होते. गोविंदा आणि साजिद चांगले मित्र आहेत. गोविंदानंच साजिद नाडियाडवाल यांची भेट दिव्या भारती यांच्याशी करून दिली होती. पहिल्या भेटीतच साजिद नाडियाडवाल यांना दिव्या भारती प्रचंड आवडल्या होत्या. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर लगेच साजिद नाडियाडवाल यांनी 15 जानेवारी 1992 मध्ये दिव्या भारती यांना लग्नासाठी प्रपोज केलं. त्यानंतर 10 मे 1992 मध्ये दोघांनी लग्न केलं. असं म्हटलं जातं की लग्न करण्यासाठी दिव्यानं तिचा धर्म बदल मुस्लिम धर्म स्विकारला. मात्र, दोघांनी या लग्नाला सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. 

हेही वाचा : 'तुम्ही काय विचार करता यानं काही फरक पडत नाही'; चेहऱ्यावरून ट्रोल करणाऱ्यांना आयशा टाकियानं दिलं सडेतोड उत्तर

साजिद नाडियाडवाल आणि दिव्या भारती यांच्या लग्नाचा शेवट फार वाईट होता. खरंतर, त्यांच्या लग्नाच्या अवघ्या 10 महिन्यात बातमी आली की दिव्या यांनी त्यांच्या राहत्या घराच्या गॅलरीतून उडी घेत आत्महत्या केली. दिव्या यांच्या निधनानंतर साजिद नाडियाडवाल यांच्यावर अनेक आरोप देखील लगावण्यात आले होते. मात्र, अनेक आरोप हे सिद्ध होऊ शकले नाही. आता असं देखील म्हटलं जातं की साजिद आजही दिव्यावर खूप प्रेम करतात. जेव्हा दिव्या यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा साजिद नाडियाडवालनं त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार केले. असं देखील म्हटलं जातं की साजिद नाडियाडवाल हे आजही त्यांच्या पाकिटात दिव्या भारती यांचा फोटो ठेवतात. 

Read More