Salman Khan Aishwarya Rai and Rekha : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटनं 12 जुलै रोजी जियो वर्ल्ड सेंटरमध्ये सप्तपदी घेतल्या. त्या दोघांचं लग्न हे कोणत्याही शाही कार्यक्रमापेक्षा कमी नव्हतं. या सगळ्यात त्यांच्या लग्नातील असा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यानं प्रत्येकाचं लक्ष वेधलं आहे. लग्नाच्या कार्यक्रमा दरम्यान, ऐश्वर्या रायला भेटल्यानंतर रेखा यांनी सलमान खानची भेट घेतली त्याच्याशी त्यांनी गप्पा मारल्या आहेत.
दरम्यान, रेडिटवर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत रेखा आणि सलमान खान हे दोघं बोलताना दिसत आहेत. खरंतर त्या दोघांनी वेगवेगळी एन्ट्री घेतली. लग्नात सलमानसोबत स्पॉट होण्याआधी रेखा आणि ऐश्वर्या राय बच्चन एकत्र बोलताना स्पॉट झाल्या. रेखा यांनी ऐश्वर्याला प्रेमानं ग्रीट केलं आणि तिची लेक आराध्याला आशीर्वाद दिला होता. ऐश्वर्या राय बच्चनला भेटल्यानंतर रेखा या सलमान खानशी बोलताना दिसल्या. त्यानंतर लगेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओत पाहायला मिळतंय की सलमान हा पुढे चालतोय आणि थोडं मागे रेखा चालत असून त्या सलमानशी बोलत आहेत. तर सलमाननं काळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. रेखा यांनी यावेळी सुंदर साडी नेसली असून त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
Salman and Rekha
byu/Icy-One-5297 inBollyBlindsNGossip
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नात रेखा, सलमान, ऐश्वर्या शिवाय प्रियांका चोप्रा, शाहरुख खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, हॉलिवूड सेलिब्रिटी किम कर्दाशियन, WWE सुपरस्चार जॉन सीना यांनी देखील हजेरी लावली होती.
हेही वाचा : अंबानींच्या लग्नात बॉम्ब! 'त्या' पोस्टमुळे मुंबई पोलिसांनी BKC मध्ये वाढवली सुरक्षा
दरम्यान, गेल्या आठवड्यात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी गेल्या आठवड्यात मुंबईतील त्यांच्या अॅन्टिलिया या घरी मामेरू सेरेमनीपासून अनंतच्या लग्नाची तयारी सुरु केली. तर शुक्रवारी 12 जुलै रोजी ते लग्न बंधनात अडकले. 13 जुलै रोजी अंबानी कुटुंबानं अनंत आणि राधिकासाठी आशीर्वाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर 14 जुलै रोजी लग्नाच्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या या लग्नात भारत आणि परदेशातूनही अनेक सेलिब्रिटी आणि दिग्गजांनी हजेरी लावली होती.