Marathi News> मनोरंजन
Advertisement

अक्षय कुमारने 'या' गोष्टीत सलमान खानला टाकलं मागे

कुणाचा आहे समावेश 

अक्षय कुमारने 'या' गोष्टीत सलमान खानला टाकलं मागे

मुंबई : अखेर फोर्ब्सची यादी जाहिर झाली आहे. यामध्ये सर्वाधिक मेहनत करणाऱ्या कलाकारांची नावे जाहीर झाली आहेत. या लिस्टमध्ये बॉलिवूडच्या सगळ्या खान्सना मागे टाकत एका अभिनेत्याने सर्वात पहिलं स्थान मिळवलं आहे. अक्षय कुमार या कलाकाराने फोर्ब्सच्या यादीत नंबर पटकावला आहे. सलमान खान कमाईच्या बाबतीत अक्षय कुमारच्या मागे आहे. मात्र सर्वाधिक धक्कादायक बाब ही आहे की, यामध्ये दरवर्षी ज्या कलाकाराच नाव असतं यंदा त्या कलाकाराचं नाव नाही. हा कलाकार आहे शाहरूख खान. यंदा फोर्ब्सच्या यादीत शाहरूख खानचा सहभाग नाही. फोर्ब्सच्या यादीच अमेरिकेचा मुक्केबाज फ्लोयड मेवेदर 28.5 करोड डॉलर म्हणजे 19.49 अरब रुपयांनी पहिल्या क्रमांकावर आहे. 

फोर्ब्सच्या 100 लिस्टमध्ये अक्षय कुमारला 76 वे स्थान मिळाले आहे. तर सलमान खान 82 व्या नंबरवर आहे. शाहरूख खानतर या लिस्टमधून बाहेरच पडला आहे. 2017 मध्ये शाहरूख खान 38 मिलियन डॉलरसोबत या लिस्टमध्ये 65 व्या क्रमांकावर होता. तर अक्षय कुमार 50 व्या क्रमाकावर असून त्याच्याकडे 3.07 अरब रुपये कमाई होती. 

fallbacks

टॉयलेट एक प्रेम कथा आणि पॅडमॅनसारख्या हिट फिल्ममुळे अक्षय कुमारने जवळपास 20 करोड रुपयांची कमाई केली आहे. तेव्हा सलमान खानने यावर्षी 3.77 करोड रुपयांची कमाई केली आहे. फोर्ब्सने सांगितल की, विश्वातील या 100 कलाकारांनी गेल्या 12 महिन्यात 6.3 अरब डॉलर म्हणजे 4.31 अरू रुपये कमाई करणे गरजेची आहे. तर त्याच्या आधी ही तुलना 22 टक्यांहून अधिक होती. या यादीत 11 कलाकारांची कमाई ही 10 करोड डॉलर आहे. 

Read More