Marathi News> मनोरंजन
Advertisement

'घरात घुसून मारेन', सलमानच्या 'या' वक्तव्यावर अभिजीत बिचुकले भडकला

बिग बॉस 15 मधील वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे.

'घरात घुसून मारेन', सलमानच्या 'या' वक्तव्यावर अभिजीत बिचुकले भडकला

मुंबई : बिग बॉस 15 मधील वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. आज वीकेंड का वार पार पडणार आहे. त्याचबरोबर आज सलमान खानची एग्रेसिव्ह स्टाईल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सलमान खान आज कोणालाच सोडण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. 

इतकंच नाही तर शारीरिक हिंसाचारामुळे उमर रियाजला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलं आहे. त्याचबरोबर अभिजित बिचुकले याचाही आज क्लास घेण्यात येणार  आहे. शिवीगाळ करणं अभिजित बिचुकलेला महागात पडणार आहे. अशाप्रकारे बिग बॉसच्या घरात स्पर्धकांची वाईट प्रकारे सलमान खान आज घरात क्लास घेणार आहे.

बिग बॉस 15 च्या लेटेस्ट प्रोमोमध्ये सलमान खान अभिजीत बिचुकलेवर राग काढत असल्याचं दिसून येतंय. जर कोणी तुमच्या कुटुंबाला घाणेरड्या शिव्या दिल्या तर तुम्हाला कसं वाटेल? असं सलमान खान म्हणाला. बिचुकलेला इशारा देताना सलमान खान म्हणाला की, जर तु पुन्हा असं केलंस तर  मिड वीक मी तुझ्या केसाला पकडून तुला बाहेर काढीन.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावर तो उद्धटपणे बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सलमान खान त्याला मध्येच थांबवतो आणि म्हणतो, तुझं हे वर्तन असंच राहिल्यास घरात घुसून तुला मारेन, यावर बिचुकले म्हणतो भाड़ में जाए ऐसा शो असं प्रोमोमध्ये दिसते. अशाप्रकारे आजचं वातावरण चांगलंच तापलं असून अभिजीत बिचुकले आज सलमान खानच्या रागातून सुटणार नाही एवढं मात्र नक्की.

Read More