Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानच्या शिक्षेवर दोस्त शोएब अख्तरने केले असे ट्वीट की...

बॉलीवूड अभिनेता सलमानला खानला काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावलीये. यासोबत त्याला जोधपूर सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलेय. आजही सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार नसल्याने आजची रात्रही सलमानला तुरुंगातच काढावी लागणार आहे. सलमानला शिक्षा झाल्याने त्याचे फॅन्स चांगलेच नाराज झालेत. 

सलमानच्या शिक्षेवर दोस्त शोएब अख्तरने केले असे ट्वीट की...

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमानला खानला काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावलीये. यासोबत त्याला जोधपूर सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलेय. आजही सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार नसल्याने आजची रात्रही सलमानला तुरुंगातच काढावी लागणार आहे. सलमानला शिक्षा झाल्याने त्याचे फॅन्स चांगलेच नाराज झालेत. 

सलमानला खानला शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने दु:ख व्यक्त केलेय. अख्तरने ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केलीये. माझा मित्र सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा मिळाल्याने दु:ख होतेय मात्र कायद्याला आपले काम केले पाहिजे. आपल्याला भारताच्या माननीय कोर्टाचा सन्मान केला पाहिजे. मात्र माझ्या मते ही शिक्षा जरा जास्त आहे. मला विश्वास आहे की सलमान लवकरच बाहेर येईल.

शोएबच्या या ट्विटनंतर पाकिस्तानी फॅन्सकडून तो चांगलाच ट्रोल होतोय. अनेकांनी तर तु काश्मीर मुद्दयावर बोलत का नाहीस असेही म्हटलेय. 

 

Read More