Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sohail Khan Affair: 'ती' मैत्रीण म्हणून येत राहिली आणि सोहेलच्या संसारात ठिणगी पडली

'त्या' अभिनेत्रीमुळे सोहेलचं 24 वर्षांचं नातं संपणार... तिच्यासोबत केलेल्या मैत्रीचा सोहेल आणि पत्नीच्या नात्यावर परिणाम    

Sohail Khan Affair: 'ती' मैत्रीण म्हणून येत राहिली आणि सोहेलच्या संसारात ठिणगी पडली

मुंबई : अभिनेता सलमान खानचं कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सलमानचा लहान भाऊ सोहेल खान आणि पत्नी सीमा खानने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच सीमा आणि सोहेलला वांद्रे कोर्टाबाहेर स्पॉट झाले होते. कोर्टातून बाहेर पडताचं दोघांनीही आपले मार्ग वेगळे केले. सोहेल आणि सीमा यांच्या घटस्फोटापूर्वी खान कुटुंबात मलायका आणि अरबाझने यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 

लग्नाच्या 24 वर्षांनंतर सोहेल आणि सीमाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या घटस्फोटाला एक प्रसिद्ध अभिनेत्री कारणीभूत असल्याचं समोर येत आहेत. या अभिनेत्रीचं नाव हुमा कुरेशी असं आहे. 

fallbacks

हुमा आणि सोहेल यांच्या नात्याच्या चर्चा सध्या तुफान व्हायरल होत आहेत. सोहेल आणि हुमा यांचं अफेअर असल्यामुळे सीमाने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे. एवढंच नाही तर काही दिवसांपासून सोहेल आणि सीमा वेगळे राहतात. 

दरम्यान, नेटफ्लिक्स शो 'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज' रिलीज झाल्यावर सोहेल आणि सीमाच्या नात्याचे सत्य समोर आले. या शोमध्ये सोहेल आणि सीमा वेगळे राहत असल्याचे स्पष्ट झालं होतं.

fallbacks

एवढंच नाही तर, माझं  सोहेलचं लग्न अपारंपरिक असल्याचेही सीमाने म्हटलं होतं. एका एपिसोडमध्येही त्यांचा मुलगा निर्वाण याबाबत तक्रार करताना दिसला होता. 

शोमध्ये नीर्वाण अमेरिकेहून परतला होता. तेव्हा सीमाने निर्वाणला तिच्याकडे राहण्यास सांगितलं. पण तो वडिलांकडे गेला. 

Read More