Salman Khan- Rashmika Mandanna : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात सलमानसोबत रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत आहे. दोघं पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. जेव्हा पासून त्या दोघांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती तेव्हा पासून ते दोघं चर्चेत आहेत. सुरुवातीला त्याचं कारण त्या दोघांमध्ये असलेला वयाचा फरक होता. त्यांच्यातील केमिस्ट्री कशी असेल या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरु होती. आता त्या दोघांनी एकमेकांसोबत असलेली ऑनस्क्रीन आणि ऑफ स्क्रीन असलेल्या त्याच्या बॉन्ड विषयी सांगितलं आहे.
त्या दोघांनी ही मुलाखत 'झूम'ला दिली होती. यावेळी सलमान मस्ती करत म्हणाला की रश्मिकाला तो ओळखत नव्हता. त्यानं सांगितलं की 'आम्ही सिकंदरसाठी एका मुलीच्या शोधात होतो. रश्मिकाचे रील्स माझ्या सोशल मीडियावर पॉपअप होत होते. मी विचार करत होतो की ही मुलगी कोण आहे. मी आयुष शर्माला म्हणालो की ही अंतिमसाठी योग्य कास्टिंग ठरेल. त्यानं मला विचारलं की ही कोण आहे माहितीये ही खूप चार्मिंग मुलगी आहे. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही 40 वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत आणि त्या लेव्हलवर आहात.'
सलमाननं पुढे म्हटलं की 'तिच्या लूकला पाहून मी विचार करत होतो की जर ती कधी अभिनय करते किंवा कोणी तिला चित्रपट, ओटीटी किंवा टीव्हीसाठी ऑफर दिली. तर ती माझ्याकडून शिकते की काय बोलायचं आहे.' तर रश्मिकानं चित्रपटात काम करण्याच्या अनुभवाविषयी बोलताना सांगितलं, यात खूप प्रेम, भीती, दु:ख, राग आहे जे कोणत्याही चित्रपटात हवं. तुम्हाला हे तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही हा चित्रपट पाहाला.'
हेही वाचा : सलमान खानची एन्ट्री पाहताच थिएटरचं झालं स्टेडियममध्ये रुपांतर; तिकिट बूक करण्या आधी वाचा रिव्ह्यू
दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन हे ए आर मुर्गदास यांनी केलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर प्रेक्षक त्यांना हा चित्रपट कसा वाटला यावर प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, अनेकांनी हा सलमानचा आजवरचा सगळ्यात चांगला चित्रपट आहे असं म्हटलं आहे.