Marathi News> मनोरंजन
Advertisement

EX Girlfriendला शिवीगाळ करत मारायचा सलमान खान?, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेन्डचा तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत     

EX Girlfriendला शिवीगाळ करत मारायचा सलमान खान?, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि सोमी अली यांच्या नात्याबद्दल सर्वांनाचं माहिती आहे. सोमी अलीने यापूर्वी मुलाखतीत सांगितले होते की, ती सलमानचा चित्रपट पाहून भारतात आली होती. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सोमी अली तिच्या नात्याबद्दल बोलत आहे. ज्याच्यासाठी ती तिचे घर सोडून भारतात आली होती तोचं व्यक्ती तिला मारहाण करायचा. असं सोमी व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.
 

आता या प्रकरणी केआरकेने एक ट्विट केलं आहे. 'सोमी अली येथे कोणावर आरोप करत आहे? तिला कोण मारायचं? कोणी सांगेल का? यामध्ये सोमी म्हणतेय की, मी बॉलिवूड अभिनेत्री होती. तेव्हा निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता या सगळ्यांनाच हिरोईनसोबत सेक्स करण्याची अपेक्षा होती. पण आता तशी परिस्थिती नसेल.. मी एका मोठ्या स्टारला डेट करत होती.

सोमी म्हणाली सलमान खानसाठी मी भारतात आली

बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सोमी म्हणाली, मी 16 वर्षांची होती. मी 'मैने प्यार किया' चित्रपट पाहिला आणि सलमान खानच्या प्रेमात पडली. मला वाटले की मला त्याच्याशी लग्न करायचे आहे. मी आईला सांगितले की मी उद्या भारतात जाणार आहे. अखेर मी भारतात आले आणि सलमानसोबत लग्न करण्याची माझी इच्छा होती...

Read More