Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड 'बिग बॉस 18'मध्ये सहभागी होणार? अभिनेत्री म्हणाली ही मोठी...

बिग बॉस 18 संदर्भात दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. आता अभिनेता सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने याचा एक भाग असल्याबद्दल वक्तव्य केलं आहे. जाणून घ्या सविस्तर

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड 'बिग बॉस 18'मध्ये सहभागी होणार? अभिनेत्री म्हणाली ही मोठी...

Bigg Boss 18 Update: टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 18'ची चाहते खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोच्या स्पर्धकांची यादीही समोर आली आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. 

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर बातम्या येत आहेत की, यावेळी अभिनेता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली देखील 'बिग बॉस 18' या शोमध्ये सहभागी होणार आहे. यावर आता अभिनेत्रीने देखील आपले मौन तोडले आहे. काय म्हणाली सोमी अली? जाणून घ्या सविस्तर

सोमी अली 'बिग बॉस 18'मध्ये सहभागी होणार?

'बिग बॉस 18'ची चाहते खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहे. अलीकडेच एका मुलाखतीत, सोमी अलीने 'बिग बॉस 18'मध्ये सामील होण्याबद्दल उघडपणे बोलले आणि त्या बातम्यांना अफवा म्हटले. अभिनेत्री म्हणाली की हा शो खूप मोठा आहे. त्यामुळे मी त्याचा भाग होऊ शकत नाही. जरी मला हा कार्यक्रम आवडतो आणि मी त्याचा आदर करते. पण मी ऐकले की ते स्क्रिप्टेड आहे. 

सोमी अली म्हणाली की, मला स्पर्धक म्हणून बोलावलं तरी मी जाणार नाही. खरे सांगायचे तर या सर्व गोष्टी रेटिंग वाढवण्यासाठी केल्या जात आहेत. आत्तापर्यंत कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याचा माझा कोणताही विचार नाही. 

सलमान-सोमीचे ब्रेकअप

सोमी अली ही काही वर्षांपूर्वी बिग बॉसचा होस्ट आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खानची गर्लफ्रेंड होती. असे म्हटले जाते की सलमान खान आणि सोमी अली हे 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण नंतर दोघेही वेगळे झाले. सोमीने तिच्या अभिनय कारकीर्दीत अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. 

सलमान खान शेवटचा 'टायगर 3' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि इमरान हाशमी होते. मात्र, सध्या सलमान खान त्याच्या आगामी 'सिकंदर' या चित्रपटामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

Read More