Salman Khan Saffron Colour Watch : बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सिकंदर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या या चित्रपटाच्या निमित्तानं तो प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सगळ्यात त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या फोटोंवरून सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्याचं कारण म्हणजे या घड्याळ्याच्या डायलवर राम मंदिर आहे. सलमानच्या घड्याळ्याचे फोटो पाहिल्यानंतर मौलानांचा संपात झाला आहे. त्यांनी यावर त्यांची संतप्त प्रतिक्रिया शेअर केली आहे.
खरंतर, सलमान खाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी त्यानं जेकब अँड कंपनी एपिक एक्स रामजन्मभूमी टायटॅनियम एडिशन 2 आहे. मुळात हे लिमिटड एडिशन वॉच असून त्याची किंमत ही 34 लाख रुपये आहे. हे घड्याळ घालून फोटो पोस्ट केल्याने मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी संतापले आहेत. सलमानने राम मंदिराचा प्रचार करत शरियतच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यासाठी सलमाननं माफी मागावी अशी मागणी मौलवींनी केली आहे.
यावेळी बोलताना मौलवी म्हणाले कोणतीही मुस्लिम व्यक्ती मग तो सलमान खान असला आणि तो राम मंदिराचा प्रचार करत असेल किंवा कोणत्या दुसऱ्या धर्माचा किंवा इतर कोणत्याही धार्मिक गोष्टींचा प्रचार करत असेल तर हे लाजिरवाणं आणि हराम आहे. अशा व्यक्तीपासून दूर रहावं. त्यासोबत त्यांनी हे म्हणायला हवं की यापुढे दुसऱ्या धर्माचा प्रचार होऊल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही. मी सलमान खानला हेच सांगू इच्छितो की त्यानं आपल्या धर्माचा आदर करायला हवा आणि धर्मात जे काही नियम आहेत त्या सगळ्यांना मान्य करायला हवं.
हेही वाचा : 'बाहुबली ड्रेस' म्हणतं नेटकऱ्यानं उडवली शिल्पा शेट्टीची खिल्ली; एक उर्फीचा उल्लेख करत म्हणाला...
दरम्यान, अनेकांनी या फोटोवर कमेंट करत सलमानच्या हातात राम मंदिराचं घड्याळ पाहून त्याचं कौतूक केलं आहे. सलमान खाननं राम मंदिराचं एडिशन घड्याळ घातलं याहुन चांगली गोष्ट काहीच नाही. तर अशा अनेक कमेंट करत अनेकांनी सलमानचं कौतूक केलं आहे. सलमानच्या 'सिकंदर' या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर तो 31 मार्च रोजी ईदच्या निमित्तानं थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.