Marathi News> मनोरंजन
Advertisement

Salman Khan गॉडफादरच नाही तर फॉलोअरपण; या 5 अभिनेत्री सल्लूच्या खास

सोशल मीडियावर करतो फक्त याच अभिनेत्रींना फॉलो 

Salman Khan गॉडफादरच नाही तर फॉलोअरपण; या 5 अभिनेत्री सल्लूच्या खास

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) चा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. देशातच नाही तर परदेशातही सलमान खानचा चाहता वर्ग मोठा आहे. मात्र सलमान खान खूपच कमी लोकांना आपल्या आयुष्याचा भाग समजतो. एवढंच नव्हे तर सलमान खान बॉलिवूडमधील खूप कमी अभिनेत्रींना सोशल मीडिया असलेल्या इंस्टाग्रामवर फॉलो करतो. 

सोशल मीडियावर बॉलिवूड कलाकारांना अनेकजण फॉलो करतात. मात्र जेव्हा सलमान खान फॉलो करतो. तेव्हा ती गोष्टच वेगळी असते. त्यामुळे सलमान खान नक्की कुणाला फॉलो करतो हे जाणून घेणं उत्सुकतेचं आहे. 

fallbacks

कतरिना कैफ : सलमान खान अभिनेत्री कतरिना कैफला खूप पसंत करतो. अनेकदा सोशल मीडियावर सलमानने ही गोष्ट फॉलो केली आहे. सलमान आणि कतरिना या दोघांनी एकत्र अनेक हिट सिनेमे दिले आहेत. चांगल प्रोफेशनल बॉन्डिंग असल्यामुळे सलमान कतरिना कैफला फॉलो करतो. 

fallbacks

संगीता बिजलानी : एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) अनेकदा सलमान खानसोबत जोडला गेला. संगीत बिजलानीने भारताचा माजी कॅप्टन मोहम्मद अजहरूद्दीनसोबत लग्न केलं होतं. मात्र या दोघांमधील मैत्री कायम राहिली. संगीताचा घटस्फोट झाल्यानंतर सलमानचं घरी येणं जाणं वाढलं आहे. 

fallbacks

डेजी शाह : अभिनेत्री डेजी शाह (Daisy Shah) ला बॉलिवूडमध्ये घेऊन येणारा सलमान खानच होता. डेजी शाहने सलमान खानच्या 'जय हो' सिनेमातून डेब्यू केलं आहे. डेजी शाहने हिंदीसोबतच कन्नड सिनेमातही काम केलंय.

fallbacks

जॅकलीन फर्नांडिस : जॅकलीन आणि सलमानची बॉन्डिंग खूप चांगली आहे. लॉकडाऊनमध्ये जॅकलीन सलमानसोबत त्याच्या फार्महाऊसवर होती. तेथूनच त्यांनी म्युझिक व्हिडीओ लाँच केला होता. 

fallbacks

इसाबेल कैफ : कतरिनाच्या पण अगोदर सलमान खान तिची बहिण इसाबेल कैफ (Isabelle Kaif) ला इंस्टाग्रामवर फॉलो करत होता. इसाबेल बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास तयार आहे. तिच्याकडे अनेक सिनेमे आहेत. 

Read More