Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानला मिळाली त्याची व्हॅलेंटाईन...

बॉलिवूडचा दबंग खान सलमानला तू लग्न कधी करणार? तुझी गर्लफ्रेंड कोण आहे? असे प्रश्न अनेकदा विचारले जातात.

सलमानला मिळाली त्याची व्हॅलेंटाईन...

नवी दिल्ली : बॉलिवूडचा दबंग खान सलमानला तू लग्न कधी करणार? तुझी गर्लफ्रेंड कोण आहे? असे प्रश्न अनेकदा विचारले जातात. त्याच्या फॅन्सलाही याविषयी जाणून घेण्याची फार उत्सुकता असते. मात्र सलमान याविषयावर मनमोकळेपणाने बोलणे टाळतो. पण आता व्हेलेन्टाईन डे ला सलमानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात सलमान याविषयावर बोलत आहे. याचीच वाट सलमानचे चाहते अनेक वर्षांपासून करत होते.

रेस ३ च्या शूटींगमध्ये व्यस्त

सलमान सध्या रेस ३ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. शूटींग बॅंकॉकमध्ये सुरू आहे. यादरम्यान जॅकलिनने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. तो प्रचंड व्हायरल झाला. 

तुम्हीच पहा या व्हिडिओत नक्की काय आहे....

ही आहे सलमानची व्हेलेन्टाईन

सलमानचा नटखट अंदाज आपण सर्व जाणतोच. याच मस्तीभऱ्या अंदाजात तो खजूर आपले व्हेलेन्टाईन आहे असे म्हणतो. तसंच सलमानच्या प्रॉडक्शन कंपनीने आगामी चित्रपट लवरात्री चे पोस्टर प्रदर्शित केले. अभिराज मीनावाला या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. हा चित्रपट गुजरातच्या प्रेमकथेवर आधारित आहे. या चित्रपटातून आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. आयुष हा सलमानच्या लहान बहिणीचा अर्पिताचा पती आहे.  

Read More