Marathi News> मनोरंजन
Advertisement

Salman Khanच्या भव्य घरात राहण्याचं स्वप्न पाहातायं, द्यावं लागेल एवढं भाडं

सलमानच्या भव्य घरात राहण्याचं तुमचं स्वप्न देखील होणार पूर्ण...  

Salman Khanच्या भव्य घरात राहण्याचं स्वप्न पाहातायं, द्यावं लागेल एवढं भाडं

मुंबई : मुंबईत स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण मेहनत करत असतं. पण जर मोठ्या  सेलिब्रिटीच्या घरी राहण्याची संधी मिळत असेल, तर तसे पैसे देखील मोजावे लागतात. सलमान खान अभिनेता असण्यासोबतच एक उद्योगपतीही आहे. सलमानच्या मुंबईत अनेक मालमत्ता आहेत. त्यापैकी सलमानने अनेक मालमत्ता भाड्याने दिल्या आहेत. सलमानच्या मालमत्तेचं भाडं ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. 

तुम्ही मुंबईत सलमान खानच्या घरी रहात असाल तर या भावनेने तुमच्या चेहऱ्यावर आपोआपच हसू उमटेल. मुंबईत काही लोक आहेत ज्यांचे घरमालक दुसरं कोणी नसून बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आहे.

मुंबईत सलमानच्या अनेक प्रॉपर्टी आहेत, त्यापैकी सलमानने त्याची एक प्रॉपर्टी भाड्याने दिली आहे. एका रिपोर्टनुसार, अभिनेत्याने शिवस्थान हाइट्स, बांद्रा वेस्ट, मुंबई येथे 95 हजार रुपये प्रति महिना भाड्याने एक घर दिले आहे.

सलमान खानचा 14व्या मजल्यावर असलेला 758 स्क्वेअर फूट अपार्टमेंट अतिशय भव्य आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, 6 डिसेंबरलाच सलमानच्या अपार्टमेंटची कागदपत्रे तयार झाली होती. सलमानने हे घर सुमारे 33 महिन्यांसाठी भाड्याने दिलं आहे. घर घेतलेल्या व्यक्तीने नोंदणीसाठी 2.8 लाख रुपये दिले आहेत.

 

Read More