Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' 8 लोकांना इंस्टाग्रामवर फॉलो करतो सलमान खान

मैत्रिणीला नाही तर तिच्या बहिणीला करतो फॉलो 

'या' 8 लोकांना इंस्टाग्रामवर फॉलो करतो सलमान खान

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान फक्त मोठ्याच पडद्यावर नाही तर छोट्या पडद्यावरही लोकप्रिय आहे. सिनेमा, सिऍलिटी शो आणि सोशल मीडियावर देखील सलमान खान खूप ऍक्टिव असतो. मग तो इंस्टाग्राम, फेसबुक असो वा ट्विटर, सलमान खानच्या फॉलोअर्स लिस्ट खूप मोठी आहे. पण तुम्हाला माहित आहे का? सलमान खान इंस्टाग्रामवर किती आणि कुणा लोकांना फॉलो करतो. ही यादी खूप खास आहे. 

fallbacks

सलमान खान इंस्टाग्रामवर एकूण 8 लोकांना फॉलो करतो. यामध्ये अभिनेता आयुष शर्मा, अतुल अग्निहोत्री, अर्पिता खान शर्मा, सोहेल खान, अरबाज खान, लूलिया वंतूर, रेनेज बेक सेल आणि इसाबेल कैफ यांचा समावेश आहे.

महत्वाचं म्हणजे सलमान खान इंस्टाग्रामवर इसाबेल कैफला फॉलो करतो पण तिची बहिण आणि अभिनेत्री कतरिना कैफला मात्र फॉलो करत नसल्याचं दिसत आहे. पण कतरिना कैफ मात्र सलमान खानला इंस्टाग्रामवर फॉलो करते. आपल्याला माहितच आहे सलमान - कतरिना खूप चांगले मित्र आहेत.

fallbacks

सलमान खान फक्त 8 लोकांना फॉलो करतो तर 26.5 मिलिअन फॉलोअर्स आहेत. BeingSalmanKhan या नावाने सलमान खानचं इंस्टाग्राम अकाऊंट आहे. 

इसाबेल कैफबद्दल बोलायचं झालं तर कतरिना कैफप्रमाणेच तिच्या फिल्मी करिअरसाठी सलमान खान मदत करत आहे. इसाबेल कैफ सलमान खानच्या बहिणीचा मुलगा आयुष शर्मासोबत 'क्वथा' या बॉलिवूड सिनेमातून डेब्यू करणार आहे. 

कामाबद्दल बोलायचं झालं तर सलमान खानचा सुपरहिट सिनेमा 'दबंग' चा तिसरा पार्ट डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाचा पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर झाला आहे. तर सलमान खानने या सिनेमाचा प्रमोशनल व्हिडीओ देखील शेअर केला आहे.  

Read More