Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रियंकाच्या रिसेप्शनमधून नाराज होऊन निघून गेला सलमान खान... अन्

रागारागात पार्टीमधून निघून गेला सलमान खान

प्रियंकाच्या रिसेप्शनमधून नाराज होऊन निघून गेला सलमान खान... अन्

मुंबई : प्रियंकासोबत असलेले सर्व जुने वाद विसरुन सलमान खानने प्रियंका चोपडा आणि निक जोनसच्या वेडिंग रिसेप्शनला हजेरी लावली. उशिरा येण्यासाठी प्रसिद्ध असलेला सलमान खानने या दिवशी वेळेवर हजेरी लावली. यानंतर त्याने मीडिया समोर पोज पण दिल्या. पण सलमानचा रिसेप्शन हॉलमध्ये जाताच हिरमूड झाला. कारण तेथे पाहुण्यांचा पताच नव्हता. प्रियंका-निक देखील पोहोचले नव्हते. हॉलमध्ये तो एकटाच सेलिब्रिटी असल्याने त्याला राग आला. त्यामुळे प्रियंका चोपडा आणि निक जोनसला न भेटताच तो पार्टीमधून निघून गेला.

सलमान निघून गेल्याची बातमी जेव्हा प्रियंका पर्यंत पोहोचली. तोपर्यंत वेळ झाली होती. भारत सिनेमा सोडल्यामुळे सलमान आधीच प्रियंकावर नाराज होता. देसी गर्लने सलमानला रिसेप्शनला येण्याची विनंती केली. सलमान आला देखील पण पुन्हा एकदा प्रियंकावर तो नाराज झाला. पण रिसेप्शन संपताच प्रियंकाने सकाळी होण्याची वाट देखील नाही पाहिली. ती लगेचच निकला घेऊन सलमानच्या घरी पोहोचली.

प्रियंकाने सलमानला उशीर झाल्याबाबत स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर निक आणि सलमानची भेट करुन दिली. सलमानचं कुटुंबिय देखील या गोष्टीमुळे आनंदीत झाले की, प्रियंका आपलेपण दाखवत सरळ त्यांच्या घरी आली. सलमानने प्रियंका आणि निकला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. दोघांचं स्वागत केलं आणि काही वेळ गप्पा देखील मारल्या.

Read More