Salman Khan on Aamir Khan's Getting Married Again and Again : कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' पुन्हा एकदा सुरु झाला आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा तिसरा सीझन सुरु झाला आहे. त्याचा पहिला एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला. यावेळी सलमान खानकडूनच या शोची सुरुवात झाली. अशात शोचे अनेक प्रोमो समोर आले आहेत. त्यात सलमान कपिल आणि त्याच्यासोबत मिळून मस्ती करताना दिसत आहे. अशात सलमाननं आमिरच्या दोन लग्नावर आणि गौरी स्प्रॅटसोबतच्या नात्यावरून मस्करी केली आहे.
खरंतर, सलमान खाननं नेटफ्लिक्सवर असलेला 'द ग्रेट इंडियन कपिल शो' च्या पहिल्या एपिसोडमध्ये पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. या दरम्यान, कपिल शर्मा आणि त्याच्या आमिर खानला घेऊन चर्चा झाली. अशात जेव्हा कपिलनं सलमानला विचारलं की 'त्याच्या आयुष्यात कोणी गौरी आहे?' तर सलमान खान त्याच्याविषयी बोलायचं सोडून आमिर खानविषयी बोलायला लागला. त्यानं उत्तर दिलं की 'आमिर आहेच तितका भारी. तो एक चांगला माणूस आहे. संपूर्ण जगाला माहित आहे की तो एक परफेक्शनिस्ट आहे. जोपर्यंत तो लग्न परफेक्ट करत नाही, तो पर्यंत करतच राहणार. मला वाटतं की ही त्याची शेवटची आहे. हे परफेक्त असेल. तो परफेक्ट होऊनच थांबणार.' सलमान खाननं केलेलं हे वक्तव्य ऐकून सगळ्यांना हसू अनावर झालं.
'द ग्रेट इंडियन कपिल शो' सीझन 3 ची परिक्षक अर्चना पूरन सिंहनं आश्चर्य व्यक्त केलं की सलमानला किती वेळा लग्ना विषयी विचारण्यात येतं. हे पाहता सलमाननं त्या सगळ्यांना प्रश्न केला जे त्याच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. 'माझं लग्न झाल्यानं तुमचा काय फायदा होणार आहे? मी तुमच्यासाठी लग्नाची पहिली रात्र साजरी करतोय? मी असं काय करतोय की तुम्हाला आनंद होतोय आणि मी उद्ध्वस्त होत आहे?' इतकेच नाही तर सलमानने घटस्फोटानंतर मिळणाऱ्या मोठ्या पोटगीचीही खिल्ली उडवली.
हेही वाचा : दुसऱ्याकडून काढून घेतले शूज, योगा करायला आलेली नुसरत भरुचा होतेय ट्रोल!
दरम्यान, आमिरविषयी बोलायचं झालं तर त्यानं पहिलं लग्न हे 1986 मध्ये रीना दत्तासोबत केलं. दोघं 2002 मध्ये विभक्त झाले. त्या दोघांना जुनैद आणि इरा असे एक मुलगा आणि मुलगी आहेत. आमिरनं दुसरं लग्न 2005 मध्ये किरण रावसोबत केलं आणि 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्या दोघांना एक मुलगा असून आजाद असं त्याचं नाव आहे. तर आता आमिरनं याच वर्षी मार्चमध्ये त्याच्या 60 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मीडियासमोर त्याची नवी गर्लफ्रेंड गौरीची ओळख करून दिली.