Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानने तुरुंगातील जेवण नाकारले, शेराने आणला नाश्ता!

काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झालेला अभिनेता सलमान खान याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तुरुंगात जाताच त्याला रक्तदाबाचा त्रास झाला होता. दरम्यान, काल त्याने तुरुंगातलं जेवण नाकारल्याचे सांगण्यात येत आहे.

सलमानने तुरुंगातील जेवण नाकारले, शेराने आणला नाश्ता!

जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झालेला अभिनेता सलमान खान याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तुरुंगात जाताच त्याला रक्तदाबाचा त्रास झाला होता. दरम्यान, काल त्याने तुरुंगातलं जेवण नाकारल्याचे सांगण्यात येत आहे.

सलमान खानला जोधपूरच्या जेलमधील दोन नंबरच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलंय. सलमान आता जोधपूर जेलमधील १०६ नंबरचा कैदी आहे. सलमान जेलमध्ये आल्यानंतर त्याचा रक्तदाब थोडा वाढला, अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक विक्रम सिंग यांनी दिलीय. 

सलमानला त्याचा बॉडिगार्ड शेराने नाश्ता आणला होता. सलमानला हा नाश्ता स्वीकारण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्याचवेळी काल त्याने तुरुंगातलं जेवण नाकारल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्याला पिण्यासाठी तुरुंगातील पाणी देण्यात आले. सलमानला कैद्याचे कपडे देण्यात आले असून तो आज सकाळपासून ते कपडे परिधान करणार असल्याचंही विक्रम सिंग यांनी सांगितलं. आता सलमानला जेलमध्ये जमिनीवरच झोपावं लागले. त्याला एक चादर देण्यात आली होती.

शिक्षा सुनावल्यानंतर सलमान खानची रवानगी जोधपूरच्या केंद्रीय कारागृहात करण्यात आली आहे. त्याला सामान्य कैद्यांप्रमाणेच वागणूक देण्यात येत आहे. कोणतीही विशेष सुविधा त्याला पुरवली जाणार नाही, असे जोधपूर कारागृहाचे उपमहानिरीक्षक विक्रम सिंग यांनी स्पष्ट केले. 

 तुरूंगात जाण्यापूर्वी सलमानची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात तो तंदुरुस्त आढळला. दरम्यान, सलमानच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्याच्या वॉर्ड बाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. त्याच्या जामीन अर्जावर आज शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या दरम्यान त्याचे वकील त्याला तुरुंगात केव्हाही भेटू शकतात. 

Read More