Salman Khan Hindu or Musalman : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या आगामी सिनेमा 'सिकंदर'ची चाहते मनापासून वाट पाहत आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच हा सिनेमा चर्चेचा विषय ठरला आहे. मोस्ट अवेटेड सिनेमा ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच गाण्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकल आहे. यामुळे होळी आणि आता ईदमध्ये होणाऱ्या सेलिब्रेशनमध्ये सिकंदर सिनेमाच्या गाण्याला पसंती मिळत आहे. सलमान खान कोणत्या धर्माचा आहे अशी देखील एक चर्चा रंगली आहे. हिंदू की मुसलमान या प्रश्नावर स्वतः सलमान खानने दिलेलं उत्तर नक्कीच मन जिंकणार आहे.
सलमान खानने स्वतः एकदा तो कोणत्या धर्माचे पालन करतो हे उघड केले होते. मग त्याने सांगितले होते की तो तीन धर्मांवर विश्वास ठेवतो. खरं तर, २०१७ मध्ये काळवीट हत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सलमान खानला त्याच्या धर्माबद्दल विचारण्यात आले होते. मग अभिनेत्याने या प्रश्नाचे उत्तर मोठ्या आत्मविश्वासाने आणि अभिमानाने दिले होते.
सलमान खानने सांगितले होते की, तो मुस्लिम आहे आणि हिंदू धर्मावरही विश्वास ठेवतो. पण यासोबतच तो भारतीय आहे आणि हा त्याच्यासाठी एकमेव धर्म असल्याचं स्वतः अभिनेता सलमान खान बोलला होता. न्यायालयात उत्तर देताना सलमानने प्रथम हिंदीत म्हटले होते - मी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही आहे. यानंतर तो इंग्रजीत म्हणाला- मी भारतीय आहे.
नॅशनल हेराल्डच्या वृत्तानुसार, सलमान खानचे वडील सलीम खान यांनीही त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि त्यांच्या मुलांच्या धर्माबद्दल उघडपणे बोलले आहे. त्यांनी एकदा म्हटले होते की, ते मुस्लिम आहेत आणि त्यांची पत्नी हिंदू आहे, म्हणून त्याच्या सर्व मुलांना स्वतंत्र मूल्यांसह वाढवले गेले आहे. सलीम खान यांनी सांगितले होते की, त्यांच्या कुटुंबात ईद आणि गणेश चतुर्थी या दोन्ही सणांचे महत्त्व आहे. सलमानच्या धर्माबद्दल त्याने म्हटले होते की, तो स्वतःला हिंदू किंवा मुस्लिम मानत नाही; तो फक्त स्वतःला सलमान आणि एक माणूस मानतो.
सलमान खानचा आगामी चित्रपट 'सिकंदर', चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. हा चित्रपट 30 मार्च 2025 (रविवार) रोजी ईदच्या खास प्रसंगी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. 'सिकंदर' मधील गाण्यांनी आधीच चर्चा सुरु केली आहे. ज्यामध्ये होळी आणि ईदचा उत्सव दिसून येत आहे. यावरुन सलमान खान प्रत्यक्षात कोणत्या धर्माचे पालन करतो याची चर्चा सुरु झाली आहे.