Marathi News> मनोरंजन
Advertisement

'ती बायको पण पळून गेली,' सलमान खानने उडवली सोहेल खानच्या घटस्फोटाची खिल्ली, 'घरातील रुममध्ये...'

सलमान खान सिकंदर चित्रपटात अखेरचा दिसला होता. नुकतीच त्याने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली. यानंतर कार्यक्रमातील त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.  

'ती बायको पण पळून गेली,' सलमान खानने उडवली सोहेल खानच्या घटस्फोटाची खिल्ली, 'घरातील रुममध्ये...'

बॉलिवूडमधील दबंग अभिनेता म्हणून सलमान खानची ओळख आहे. सलमान खान आपला कडक स्वभाव, स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. त्याची दुसरी एक बाजू म्हणजे आपल्या मित्र, कुटुंबीयांसह असताना नेहमी हसत खेळत असतो. कार्यक्रमात तो खिल्ली उडवताना तसंच खळखळून हसताना दिसतो. नुकतीच त्याने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने थेट आपला भाऊ सोहेल खानच्या सीमा सजदेहसोबतच्या अपयशी लग्नाची खिल्ली उडवली. 

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये सहभागी होताना सलमानने वांद्रे येथील त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरातील किस्से सांगितले. आपल्या घराचे दरवाजे नेहमीच सर्वांसाठी खुले असतात असं सलमानने यावेळी सांगितलं. यावेळी त्याने सेलिब्रिटी फोटोग्राफर अविनाश गोवारीकरशी संबंधित एक किस्सा सांगितला.

"अविनाश माझ्या घरी आला होता. त्याच्याकडे घर नसल्याने काही दिवस तुझ्या घरी राहतो असं त्याचं म्हणणं होतं. काही वर्षांनी त्याला तुला अजून घर मिळालं नाही का विचारलं. त्यावर तो म्हणाला, इथे आल्यानंतर काही दिवसांत मला मिळालं. पण मला या घरातील वातावरण फार आवडलं असल्याने इथेच राहत आहे. ते घर तर मी भाड्याने दिलं आहे", असा किस्सा सलमानने सांगितला.  

हा किस्सा सांगताना त्याने सोहेल खानचा उल्लेख केला. तो म्हणाला, "त्याचदरम्यान सोहेल खानने पळून जाऊन लग्न केलं. आता तर बायकोही पळून गेली". हे ऐकल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू आणि अर्चना यांना हसू अनावर झालं होतं. 

पुढे त्याने संदर्भ देत सांगितलं की, सोहेलने अविनाशला सीमासोबत राहायचं असल्याने रुम रिकामी कऱण्यास सांगितलं. त्यावर अविनाश म्हणाला, "हे योग्य नाही, तू असं कसं काय लग्न करु शकतोस?".

सोहेल आणि सीमा यांनी पळून जाऊन आर्य समाज पद्धतीने लग्न केलं होतं आणि त्यानंतर 1998 मध्ये निकाह केला. 2000 मध्ये त्यांना पहिला मुलगा निर्वाण आणि 2011 मध्ये दुसरा मुलगा योहान झाला. 24 वर्षांच्या संसारानंतर 2022 मध्ये ते वेगळे झाले. सीमा आता विक्रम आहुजा याला डेट करत आहे.

सलमान खान 'सिकंदर' चित्रपटात अखेरच दिसला होता. ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर आणि सत्यराज यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर आहे.

सलमान यानंतर अपूर्व लाखियाच्या 'गलवान' चित्रपटात दिसणार आहे. 2020 मध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षादरम्यान 16 बिहार रेजिमेंटचे नेतृत्व करणारे अधिकारी कर्नल बी संतोष बाबू यांची भूमिका तो साकारणार आहे. 

Read More