Marathi News> मनोरंजन
Advertisement

आतल्या व्यक्तीनेच केला सिंकदर' लीक; काजोल अग्रवालच्या आत्महत्येचा सीन पायरेडेट व्हर्जनमध्ये

Sikandar Movie Leaked Online : सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट लीक... थिएटरमध्ये न दाखवलेले सीन देखील पायरेटेड व्हर्जनमध्ये 

आतल्या व्यक्तीनेच केला सिंकदर' लीक; काजोल अग्रवालच्या आत्महत्येचा सीन पायरेडेट व्हर्जनमध्ये

Sikandar Movie Leaked Online : बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानच्या सिकंदरची प्रदर्शित होण्या आधी जितकी चर्चा आणि उस्तुकता प्रेक्षकांमध्ये होती ती आता कमी झाली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली पण त्यानंतर काहीच काळात त्यांनी या चित्रपटाला पाहणाऱ्यांची संख्या ही कमी होताना दिसली. त्याचं कारण म्हणजे प्रदर्शनाच्या काही काळातच हा चित्रपट टेलिग्राम ग्रुप्सवर लीक झाला. आता अशी माहिती समोर आली आहे की जे सीन हे थिएटरमध्ये पाहायला मिळत नाही आहेत ते सीन या लीक झालेल्या चित्रपटात पाहायला मिळत आहेत. 

'बॉलिवूड हंगामा'नं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, सलमाच्या चित्रपटाच्या पायरेटेड व्हर्जनमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की रश्मिकाला वकील होण्याची इच्छा होती याविषयी सलमान खानला तिच्या मृत्यूनंतर कळतं. त्याशिवाय त्याला एक मेडिकल विद्यार्थी धारावीच्या प्रदुषणाविषयी सांगतो, सत्यराजला त्या तीन लोकांविषयी कळतं ज्यांना रश्मिकाचे अवयव मिळाले आणि ते कुठे राहतात याविषयी देखील कळतं. इतकंच नाही तर काजल अग्रवालनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याविषयी देखील कळतं. त्यात लुलिया वंतुर ही रश्मिका मंदानासाठी गाणं गात असल्याचं दाखवण्यात आलेलं नाही.

दरम्यान, एका मनोरंजन वेबसाईटल्या मिळालेल्या माहितीनुसार, 'एका व्यक्तीनं सांगितलं की हा चित्रपट लीक करण्याचं काम हे एका आतल्या माणसाचं आहे आणि हे सगळं चित्रपट हा CBFC कडून परवानगी मिळाल्यानंतरचा आहे.'

हेही वाचा : अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायकानं काढला 'हा' टॅट्यू; आहे खास अर्थ Photo Viral

या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर याचं दिग्दर्शन हे एआर मुरुगदॉस यांनी केलं आहे. त्यांनी तमिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीला चांगले चित्रपट दिलेत. त्यात गजनी आणि थुपक्की हे चित्रपट देखील आहेत. साजिद नाडियाडवाला यांनी 'सिकंदर' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सलमान खान आणि साजिद नाडियाडवाल हे 2014 नंतर पहिल्यांदा किक या चित्रपटात एकत्र आले. या चित्रपटात सलमानसोबत रश्मिका मंदाना, सत्यराज, जतिन सरना आणि शर्मन जोशी हे कलाकार दिसले. 

Read More