Marathi News> मनोरंजन
Advertisement

कॅटरिना कैफ नव्हे तर सलमान खानच्या मते 'ही' अभिनेत्री सर्वोत्तम !

अभिनेता सलमान खान हा बॉलिवूडचा दबंगस्टार आहे. नव्या पिढीतील अनेक आघाडीच्या आणि नवख्या अभिनेत्रींसोबतची सलमान खानने काम केले आहे. यामध्ये अनुष्का शर्मा, डेजी शहा, कॅटरिना कैफचा समावेश होतो. मात्र एका रिएलिटी शोमध्ये सलमान खानने त्याची आवडती अभिनेत्री कोण ? या गोष्टीचा खुलासा केला आहे. 

कॅटरिना कैफ नव्हे तर सलमान खानच्या मते 'ही' अभिनेत्री सर्वोत्तम !

मुंबई : अभिनेता सलमान खान हा बॉलिवूडचा दबंगस्टार आहे. नव्या पिढीतील अनेक आघाडीच्या आणि नवख्या अभिनेत्रींसोबतची सलमान खानने काम केले आहे. यामध्ये अनुष्का शर्मा, डेजी शहा, कॅटरिना कैफचा समावेश होतो. मात्र एका रिएलिटी शोमध्ये सलमान खानने त्याची आवडती अभिनेत्री कोण ? या गोष्टीचा खुलासा केला आहे. 

डान्स दिवानेमध्ये सहभागी झाली रेस 3 ची टीम - 

माधुरी दीक्षितच्या डान्स दिवाने या कार्यक्रमामध्ये जॅकलिन फर्नांडीस, सलमान खानसह रेस 3 ची टीम पोहचली होती. यावेळेस नव्या पिढीतील अभिनेत्रींपैकी जॅकलीन फर्नांडीस ही सर्वोत्तम अभिनेत्री असल्याचं त्याने म्हटले आहे. या कार्यक्रमामध्ये दोघांनी 'हिरिए' या गाण्यावरही डान्स केला आहे. 

1,2,3... गाणं  

माधुरी दीक्षितचं 1,2,3 ..  हे गाणं पुन्हा रिक्रिएट करण्यात आलं आहे. यामध्ये जॅकलिन फर्नांडिस पुन्हा या गाण्यावर थिरकली. हा अनुभव शेअर करताना जॅकलिन म्हणाली इतकं प्रतिष्ठित गाणं पुन्हा रिक्रिएट करण्याची संधी मला मिळाली आहे. जॅकलीन वाक्य पूर्ण करणार इतक्यातच तिला मध्येच तोडत जॅकलीन नव्या पिढीतील उत्तम अभिनेत्री असल्याचं त्याने म्हटलं आहे. यापूर्वीही सलमान खान आणि जॅकलिन 'किक' चित्रपटामध्ये एकत्र दिसले होते. 

रेमो डिझुजा दिग्दर्शित 'रेस 3' चित्रपटामध्ये सलमान खान, डेजि शहा, बॉबी देओल, अनिल कपूर, साकिब सलीम अशी तगदी स्टारकास्ट आहे. 'रेस 3' चित्रपट 15 जून म्हणजेच यंदाच्या ईदला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 

Read More