Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं आजवर एकामागे एक असे हिट चित्रपट दिले आहेत. त्याची प्रत्येक चित्रपटातील स्टाइल ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. सलमान हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी त्याचं खासगी आयुष्य तर कधी त्याच्या चित्रपटामुळे तो चर्चेत असतो. सलमान खान सध्या ‘सिकंदर’ या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, त्यानं हे मान्य केलं की आजवर तो अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे आणि आता त्याला कोणत्याही वादात अडकायचं नाहीये असं त्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
न्यूज एजन्सी एनएनशी बोलताना सलमान खान हा चित्रपटांना घेऊन वादाच्या भोवऱ्यात अडकण्यावरून वक्तव्य केलं आहे. त्यानं हात जोडत सांगितलं की 'अरे नाही... मला कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोव्हर्सी नको... मोठ्या मोठ्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये मी अडकलो होतो आता आणखी नको... आता आम्हाला असं वाटतं नाही की कॉन्ट्रोव्हर्सीमुळे कोणता चित्रपट हीट होईल. आम्ही पाहिलंय की कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये फ्रायडे रिलीज पुढच्या मंगळवारी झाली. चित्रपट प्रदर्शित व्हायला हवा, कोणती कॉन्ट्रोव्हर्सी नको.'
#WATCH | Mumbai: "...Bohot saare controversies se guzar chuke hai hum, humko nahi chahiye koi controversy...Yeh pariwar bas without controversies life-long rahe...Kaafi dekh chuke hai hum" says actor Salman Khan pic.twitter.com/Ixr39TqYky
— ANI (@ANI) March 29, 2025
सलमान खाननं पुढे सांगितलं की 'आम्ही इतकं काही पाहिलं आहे की आता काही पाहण्याची इच्छा नाही. फक्त कुटुंब कॉन्ट्रोव्हर्सीपासून लांब रहायला हवं. आता फक्त इतकंच पाहिजे.'
चित्रपटाविषयी सलमान खान म्हणाला, 'जेव्हा तुम्ही चित्रपट पाहाल, तेव्हा तुम्हाला वाटेल की ट्रेलरमध्ये काहीच दाखवलं नाही, कारण ट्रेलरमध्ये अनेक गोष्टी या दाखवल्याच नाही. या चित्रपटात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खूप आवडतील.'
दरम्यान, या आधी सलमान खाननं एका मुलाखती दरम्यान, गॅन्गस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीवर प्रतिक्रिया दिली होती. त्यानं म्हटलं की 'ईश्वर, अल्लाह सगळे एकत्र आहेत. जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत जिवंत राहू...'
हेही वाचा : ऑरीच्या यशामागे आहे 'ही' बॉलिवूड अभिनेत्री! चित्रपटांमधून झालीये गायब, कधीकाळी शाहरुखसोबत केलंय काम
तर सलमानच्या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर त्याच्या सिकंदर या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात युलिया वंतूरनं गाणं देखील गायलं आहे.