Marathi News> मनोरंजन
Advertisement

गँगस्टर्सच्या निशाण्यावर Salman Khan, अटकेत असलेल्या शूटरकडून मोठा खुलासा

सुरक्षेत वाढ केल्यानंतरही सलमान खान गँगस्टर्सच्या निशाण्यावर, अनेक दिवसांनंतर मोठा खुलासा
 

गँगस्टर्सच्या निशाण्यावर Salman Khan, अटकेत असलेल्या शूटरकडून मोठा खुलासा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खान (Salman Khan) चर्चेत आहे. अनेक चाहत्यांच्या मनात घर केलेल्या सलमानच्या जीवा धोका असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. अभिनेत्याच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या (sidhu moose wala) मृत्यूनंतर सलमान खानच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली.  (Salman's security increased)

नुकताच, सिद्धू मूसवाला खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शूटरने सलमान खान गँगस्टर्सच्या निशाण्यावर असल्याचं उघड केलं आहे. पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी ही माहिती दिली आहे. (Salman Khan targeted by gangsters)

पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सलमान खान गँगस्टर्सच्या निशाण्यावर आहे. सिद्धू मूसवाला प्रकरणात अटक करण्यात आलेला सहावा शूटर कपिल पंडित याने चौकशीत खुलासा केला आहे की, लॉरेन्स बिश्नोईने  पंडितला सलमान खानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं.  

जूनमध्ये सलमान खान आणि सलीम खान यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. एवढंच नाही तर, एका पत्रात सलमान खानलाही सिद्धू मूसवाला करणार असल्याचं लिहिलं होतं. त्यानंतर पोलिसांनी सलमानची सुरक्षा वाढवली होती.

Read More