Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानकडून काही खास लोकांसाठी 'भारत'चं स्पेशल स्क्रीनिंग

'भारत'च्या यशानंतर सलमानने एक खास स्क्रिनिंग ठेवलं होतं.

सलमानकडून काही खास लोकांसाठी 'भारत'चं स्पेशल स्क्रीनिंग

मुंबई : बॉलिवूड दबंग सलमान खानचा 'भारत' चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करत आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'भारत'ने कमाईची शंभरी पार केली. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत'च्या यशानंतर सलमानने एक खास स्क्रिनिंग ठेवलं होतं. सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. 

सलमानने 'भारत'चं स्क्रीनिंग अशा खास लोकांसाठी ठेवलं होतं ज्यांनी देशाचे विभाजन होताना पाहिलं होतं. सलमानने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ''भारत'चं अशा खास कुटुंबियांसाठी स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आलं आहे, ज्यांनी १९४७ मध्ये घडलेल्या घटना आणि देशाचे विभाजन पाहिले आहे. या सर्वांना भेटल्याचा मला अतिशय अभिमान वाटत आहे. रियल 'भारत' कुटुंबियांना सलाम' असं कॅप्शनही सलमानने फोटोला दिलं आहे. सलमानची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. 

fallbacks

सलमान आणि कतरिनाने मेहबूब स्टूडिओमध्ये या खास कुटुंबियांसोबत वेळ व्यतित केला. या स्क्रीनिंगदरम्यान सलमानने फोटो क्लिक केले. तसेच त्यांच्यासोबत बातचीतही केली. सलमान खान आणि तकरिना कैफ स्टारर चित्रपट 'भारत'ने आतापर्यंत १५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. 

Read More