Marathi News> मनोरंजन
Advertisement

Race 3 चा धमाकेदार ट्रेलर, सलमान खानची खास भेट

सलमान खान यंदा ईदच्या मुहुर्तावर त्याच्या चाहत्यांसाठी' रेस 3' हा सिनेमा घेऊन येणार आहे. 

Race 3 चा धमाकेदार ट्रेलर, सलमान खानची खास भेट

 मुंबई : सलमान खान यंदा ईदच्या मुहुर्तावर त्याच्या चाहत्यांसाठी' रेस 3' हा सिनेमा घेऊन येणार आहे. या सिनेमातील पात्रांची ओळख करून दिल्यानंतर आता ट्रेलरकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते.  गेल्या काही दिवसांपासून 'रेस 3' चा ट्रेलर येणार की नाही ? याबाबत खुद्द सलमान खानचं कन्फ्युजन निर्माण करत होता. मात्र आज अखेर या सार्‍या लपाछपीवर पडदा पडला आहे. अखेर 'रेस 3' चा ट्रेलर रीलिज करण्यात आला आहे.  

 

 रेस 3 बाबत उत्सुकता  

 रेस 3 या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खान, अनिल कपुर, जॅकलीन फर्नांडीज, डेजी शाह, बॉबी देओल आणि प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. यापूर्वी 'रेस'मध्ये सैफ अली खान प्रमुख भूमिकेत झळकला होता. आता सलमान खान प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे 'रेस' च्या तिसर्‍या सिरीजबाबत लोकांच्या मनात उत्सुकता आहे. रेमो डिझुजाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. 

'रेस 3' या चित्रपटाचं शुटिंग भारतामध्ये काश्मिर, राजस्थान तसेच परदेशात अबुधाबीमध्ये करण्यात आले आहे.  यंदाच्या ईदला म्हणजेच 15 जून 2018 ला हा सिनेमा रिलिज होणार आहे. 

Read More